ठळक मुद्देपूजा अनेकवेळा तिच्या लहानपणीचे देखील फोटो पोस्ट करते. तिच्या लहानपणीचे फोटो पाहून ती लहानपणी देखील तितकीच क्यूट होती असेच म्हणावे लागेल.

पूजा भटने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पूजा भटने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने दिल है के मानता नही, सडक, जुनून, बॉर्डर, जख्म यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मामित करण्यात आलेले आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची बहीण आलिया भटने देखील बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. राजी, गली बॉय, हायवे यांसारख्या अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.

पूजा भटने तिचे वडील महेश भट यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती अनेक वर्षांनंतर सडक २ चित्रपटात झळकणार असून विशेष म्हणजे तिचे वडील महेश भटच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात तिच्यासोबतच तिची बहीण आलिया भट, सिद्धार्थ रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

संजय आणि पूजाचा सडक हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता याच चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच सडक २ प्रेक्षकांच्या भेटीस येत असून हा चित्रपट २५ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. सडक २ या चित्रपटात आलिया भटची आई सोनी राजदान या देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे म्हटले जाते.  

पूजा भटने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. या फोटोंना तिच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते. ती अनेकवेळा तिच्या लहानपणीचे देखील फोटो पोस्ट करते. तिच्या लहानपणीचे फोटो पाहून ती लहानपणी देखील तितकीच क्यूट होती असेच म्हणावे लागेल. तिचे हे फोटो पाहून तिचे फॅन्स तिचे नेहमीच भरभरून कौतुक करतात. 


Web Title: pooja bhatt childhood pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.