Payal Ghosh thanks Kangana Ranaut for her support and says we can together bring all of them down | पायल घोषने मानले कंगना रणौतचे आभार, म्हणाली - 'सोबत मिळून सर्वांना खाली खेचू....'

पायल घोषने मानले कंगना रणौतचे आभार, म्हणाली - 'सोबत मिळून सर्वांना खाली खेचू....'

अभिनेत्री पायल घोषने नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नाचा आरोप लावला. यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अनुरागच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत. तर दुसरीकडे कंगना रणौतने पायलला सपोर्ट केलाय. कंगनाने तर थेट अनुरागच्या अटकेची मागणीही करून टाकली. आता पायलने सपोर्ट केल्याबद्दल कंगनाने आभार मानले आहेत.

पायल घोषने ट्विट करत लिहिले की, 'तुझ्या सपोर्टसाठी धन्यवाद कंगना रणौत. सध्या तुझा  सपोर्ट माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आपण स्त्री आहोत आणि आपण सोबत मिळून या सर्वांना खाली खेचू शकतो'. अभिनेत्री पायल घोषचा आरोप आहे की, २०१५ मध्ये अनुराग कश्यपने तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता.

कंगना काय म्हणाली?

पायलच्या आरोपनंतर कंगनाने ट्विट करत लिहिले की, 'बॉलिवूड पूर्णपणे लैंगिक भक्षकांनी भरलेले आहे. हे लोक केवळ लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात. प्रत्यक्षात दरदिवशी स्वत:ला खूश करण्यासाठी त्यांना सुंदर मुलगी हवी असते. केवळ मुलीच नाही तर सुंदर व गरजू मुलांसोबतही ते हेच करतात. माझ्यासोबत जे काही झाले, त्याचा मी माझ्यापरीने निकाल लावला. मला मीटूची गरज नाही. पण मुलींनी याबद्दल अवश्य विचार करावा', असे आणखी एक ट्विट कंगनाने केले आहे.

‘अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितले, ते माझ्यासोबतही घडले आहे. असे अनेक बडे हिरो आहेत, ज्यांनी माझ्यासोबतही असला प्रकार केला आहे. बंद व्हॅनमध्ये किंवा बंद खोलीत किंवा मग डान्स करताना असे अनेकदा घडले. पार्टीत डान्स करताना अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ येते. अनेकदा ते कामासाठी घरी बोलवतात आणि मग तुमच्यावर बळजबरी करतात. यानंतरही आम्ही किती हुशार, असा आव आणतात, असे ट्विट कंगनाने केले आहे.

अनुरागने दिलं स्पष्टीकरण

अनुराग कश्यपने या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत या आरोपांना उत्तर दिले़. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले. त्याने लिहिे की, 'क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत', असे पहिले ट्विट अनुरागने केले.

हे पण वाचा :

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

‘अनेक बड्या हिरोंनी माझ्यासोबतही...’; कंगना राणौतचा धक्कादायक आरोप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Payal Ghosh thanks Kangana Ranaut for her support and says we can together bring all of them down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.