kangana ranaut says what payal ghosh says many big heroes have done this to me also | ‘अनेक बड्या हिरोंनी माझ्यासोबतही...’; कंगना राणौतचा धक्कादायक आरोप

‘अनेक बड्या हिरोंनी माझ्यासोबतही...’; कंगना राणौतचा धक्कादायक आरोप

ठळक मुद्देस्ट्रगल करणा-या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात’, अशा शब्दांत तिने अनुरागवर निशाणा साधला.

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करताच अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झालीय. अनुरागला अटक करा, अशी मागणी करत कंगनाने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. पायल घोषसोबत जे काही झाले, तेच बॉलिवूडमध्ये माझ्यासोबतदेखील घडले आहे. काही बड्या अभिनेत्यांनी माझ्यावरही जबरदस्ती केली होती, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
नेहमीप्रमाणे कंगनाने एकापाठोपाठ एक ट्विट करत, आपबीती सांगितली.


 
‘अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितले, ते माझ्यासोबतही घडले आहे. असे अनेक बडे हिरो आहेत, ज्यांनी माझ्यासोबतही असला प्रकार केला आहे. बंद व्हॅनमध्ये किंवा बंद खोलीत किंवा मग डान्स करताना असे अनेकदा घडले. पार्टीत डान्स करताना अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ येते. अनेकदा ते कामासाठी घरी बोलवतात आणि मग तुमच्यावर बळजबरी करतात. यानंतरही आम्ही किती हुशार, असा आव आणतात, असे ट्विट कंगनाने केले आहे.
 
बॉलिवूडमध्ये सर्वत्र लैंगिक भक्षक 

बॉलिवूड पूर्णपणे लैंगिक भक्षकांनी भरलेले आहे. हे लोक केवळ लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात. प्रत्यक्षात दरदिवशी स्वत:ला खूश करण्यासाठी त्यांना सुंदर मुलगी हवी असते. केवळ मुलीच नाही तर सुंदर व गरजू मुलांसोबतही ते हेच करतात. माझ्यासोबत जे काही झाले, त्याचा मी माझ्यापरीने निकाल लावला. मला मीटूची गरज नाही. पण मुलींनी याबद्दल अवश्य विचार करावा, असे आणखी एक ट्विट कंगनाने केले आहे.

मीटू फेल
बॉलिवूडमध्ये मीटू ही मोहिम का फसली, याचे कारणही कंगनाने एका ट्विटमध्ये दिले आहे. ‘बॉलिवूडमध्ये मीटू मोहिम पूर्णपणे फसली याचे कारण म्हणजे, बॉलिवूडमधील वासनांध लिबरल. त्यांनीच ही मोहिम हाणून पाडली. मी मनापासून पायल घोषसोबत आहे,’ असे कंगनाने लिहिले.

 अनुरागवर पुन्हा साधला निशाणा


पायल घोषने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने अनुराग कश्यपला पुन्हा लक्ष्य केले.  ‘मला ठाऊक आहे त्यानुसार, अनुराग कधीच एकावेळी एका पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हता. त्याने स्वत:ही याची कबुली दिली आहे. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवले आहे.
 अनुरागने पायलसह जे काही केले, ते बुलिवूडमध्ये सर्रासपणे होताना दिसते. स्ट्रगल करणा-या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात’, अशा शब्दांत तिने अनुरागवर निशाणा साधला.

‘मुंबईला POK नाही तर सीरिया म्हणायला हवे होते’ ; कंगना राणौत आता राहुल गांधींवर घसरली

अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut says what payal ghosh says many big heroes have done this to me also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.