Payal Ghosh ready to apologise to Richa Chadha in defamation case but on one condition bombay high court gives 2 days to both the parties | पायल घोष रिचा चड्ढाची माफी मागायला तयार, पण ठेवली एक अट...

पायल घोष रिचा चड्ढाची माफी मागायला तयार, पण ठेवली एक अट...

अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या अभिनेत्री पायल घोषने अभिनेत्री रिचा चड्ढाबाबत मीडियासमोर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर रिचाने पायल विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. सोमवारी बॉम्बे हायकोर्टाने पायल आणि रिचाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. जेणेकरून दोघी हे प्रकरण सोडवण्यासाठी अटी ठरवू शकतील.

पायल माफी मागणार, पण एका अटीवर...

याआधीच्या सुनावणीत पायलच्या वकीलांनी सांगितले होते की, पायल तिचं वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे आणि माफी मागायलाही तयार आहे. पण आता असं ऐकायला मिळत आहे की, पायलने माफी मागण्याबाबत एक अट ठेवली आहे. पायल म्हणाली की, ती रिचाला माफी मागेल, पण तिने गॅरन्टी द्यायला हवी की, यानंतर ती तिच्यावर कोणताही गुन्हेगारी आरोप लावणार नाही. ( रिचा चड्ढाने डिलीट केले महिला आयोगाबाबतचे 'ते' ट्विट, जाणून घ्या कारण...)

काय म्हणाले पायलचे वकिल

पायलचे वकिल कोर्टात म्हणाले की, 'याआधीच्या सुनावणीनंतर रिचा चड्ढाने मीडियात काही वक्तव्य केलं. ज्यात ती म्हणाली होती की, ती केस जिंकली आहे. यामुळे पायल घोषला सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. पण तरी सुद्धा ती हे प्रकरण सोवडण्यासाठी तयार आहे'. दरम्यान कोर्टाने आधीच्या सुनावणीत सांगितले होते की, दोन्ही पक्ष आपसात प्रकरण मिटवू शकतात. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला होणार आहे. ( ही माफिया गँग मला ठार मारेल...! पायल घोषने थेट पीएम मोदींकडे मागितली मदत)

पायल दिला होता माफी मागण्यास नकार

याआधी पायलने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लिहिले होते की, ती कुणालाही माफी मागणार नाहीये. ती ट्विट करून म्हणाली होती की, तिचं रिचासोबत काही देणंघेणं नाही. ती असं काही बोलली नाही ज्यावर रिचाला माफी मागावी. पायलने मीडियाोबत बोलताना सांगितले होते की, अनुराग कश्यप तिला कथितपणे म्हणाला होता की, रिचा चड्ढा, माही गिल आणि हुमा कुरेशी त्याला सेक्शुअल फेव्हर देतात.

काय म्हणाली होती पायल घोष

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले.  त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला  मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला.  मी  तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Payal Ghosh ready to apologise to Richa Chadha in defamation case but on one condition bombay high court gives 2 days to both the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.