payal ghosh appeals to pm modi for help and says mafia gang will kill | ही माफिया गँग मला ठार मारेल...! पायल घोषने थेट पीएम मोदींकडे मागितली मदत

ही माफिया गँग मला ठार मारेल...! पायल घोषने थेट पीएम मोदींकडे मागितली मदत

ठळक मुद्देअनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता पायलने ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. ही माफिया गँग मला जीवे मारेल..., असे पायलने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 ‘ही माफिया गँग मला मारून टाकेल सर आणि माझ्या मृत्यूला आत्महत्या वा अन्य काही सिद्ध केले जाईल,’असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.  या तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग केले आहे. 

पण ती आत्महत्या नसेन...
याआधीही आपल्या जीवास धोका असल्याचे पायलने म्हटले होते.    ‘मिस्टर अनुराग विरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला या घटनेसंदर्भात एक मुलाखत दिली होती आणि नंतर मला समजले की, त्यांना यासाठी कश्यपची परवानगी हवी होती.  जर मी फासावर लटकलेली आढळले तर लक्षात ठेवा ती मी स्वत:हून केलेली आत्महत्या नसेल,’ असे ट्विट तिने केले होते.

कधी झाली होती भेट?
‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच दरम्यान म्हणजे 2014-15 मध्ये हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच ट्विटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे.

काय म्हणाली होती पायल?

अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तन केले. पीएमओ आणि नरेंद्र मोदीजी यावर अ‍ॅक्शन घ्या. या क्रिएटीव्ह व्यक्तीच्या मागे लपलेला राक्षस देशाला दाखवा. मला हे माहीत आहे की, तो मला नुकसान पोहोचवू शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा,’असे ट्विट करत पायलने खळबळ निर्माण केली होती. यानंतर तिने अनुरागविरोधात एफआयआर दाखल केला होता.

काय आहे प्रकरण

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले.  त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला  मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला.  मी  तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.

अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -

SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

अनुरागने नाकारले होते आरोप
अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.
हा सगळा मला फसवण्याचा कट असल्याचा दावा अनुरागने केला होता.
क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे   ट्विट अनुरागने त्याने केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: payal ghosh appeals to pm modi for help and says mafia gang will kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.