Once again Vicky Kaushal and Katrina Kaif became a spot together, but the cameras were captured differently | पुन्हा एकदा विकी कौशल व कतरिना कैफ झाले एकत्र स्पॉट, मात्र कॅमेऱ्यात कैद झाले वेगवेगळे
पुन्हा एकदा विकी कौशल व कतरिना कैफ झाले एकत्र स्पॉट, मात्र कॅमेऱ्यात कैद झाले वेगवेगळे

बॉलिवूडमध्ये कुणाचं ब्रेकअप होईल आणि कोणाचे नातं जुळेल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांपासून कतरिना कैफचं नाव विकी कौशलसोबत चर्चेत आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजारो दिलेला नाही. यादरम्यान कतरिना व विकी कौशलचे नवीन फोटो चर्चेत आले आहेत. त्या दोघांना काल रात्री फ्रेंडच्या डिनर पार्टीमध्ये पाहिलं होतं. 

ही पार्टी अली अब्बाज जफरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होती जी मुंबईतील त्याच्या घरी होती. या पार्टीत कित्येक बॉलिवूडचे स्टार आले होते पण सगळ्यांचे लक्ष त्या दोघांवरच टिकून राहिले होते. या पार्टीत ते दोघं वेगवेगळे गेले होते. दोघांनी एकत्र फोटो काढले नाहीत. पण एकत्र खूप धमालमस्ती केली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.


यावेळी कतरिना कैफने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर विकी कौशलनं काळ्या रंगाची ट्रॅक पँट व फुली स्लीव्जचं टीशर्ट परिधान केलं होतं. या दोघांच्या अफेयरच्या चर्चा मागील वर्षांपासून सुरू आहेत. 
कतरिनाच्या आधी विकी कौशलचं हरलीन सेठीसोबत अफेयर होते. हरलीनसोबत विकीचं एप्रिल २०१९मध्ये ब्रेकअप झाले आणि त्यानंतर विकी कौशलसोबत कतरिनाचं नाव जोडलं गेलं. 

Web Title: Once again Vicky Kaushal and Katrina Kaif became a spot together, but the cameras were captured differently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.