बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ती तब्बल १२-१२ किलो वजनाचे डंबेल्स हातत घेऊन वर्कआऊट करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ पाहून सर्व थक्क झाले आहेत. 

उर्वशी सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी ती फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतेय. चेस्ट एक्सरसाईज करत असताना उर्वशीनं डंबेल्स हातात घेतलेले दिसत आहेत. हे डंबेल्स काही हलके नाहीत तर तब्बल १२-१२ किलो वजनाचे डंबेल्स घेऊन ती वर्कआऊट करते आहे. 

या व्हिडिओमध्ये ती चांगलीच घाम गाळतांना दिसतेय. तिने हा आपला वर्कआऊटचा व्हिडिओ खास तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट केलाय. हा व्हिडिओ पोस्ट करत उर्वशीनं म्हटलं की, ‘५ वर्कआऊट करणाऱ्या लोकांना टॅग करा’. 

उर्वशी रौतेला तिच्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली आहे. तिने अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षी इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता. २०११ साली उर्वशीने इंडियन प्रिंसेस, मिस टूरिझम, मिस एशियन सुपरमॉडेल हे किताब आपल्या नावावर केले. 


उर्वशीने २०१३ साली ‘सिंह साहब द ग्रेट’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती रेस-३, सनम रे, भाग जॉनी, ग्रेट ग्रँड मस्ती, काबिल या चित्रपटात झळकली. 


एका रिपोर्टनुसार उर्वशी रौतेलाने सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. तिला सलमानच्या ‘सुलतान’ची ऑफर मिळाली होती. मात्र तेव्हा ती ‘मिस यूनिवर्स २०१५ची तयारी करत असल्यामुळे तिला ही ऑफर सोडावी लागली होती.त्यानंतर हा चित्रपट अनुष्का शर्माने केला.


उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘पागलपंती’ चित्रपटामध्ये उर्वशी रौतेला दिसणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात उर्वशी जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

पागंलपती सिनेमाचं दिग्दर्शन अनीज बझ्मी करत आहेत. या कॉमेडी सिनेमात उर्वशी आणि जॉन अब्राहम यांच्यासोबतच एलियाना डिक्रूज, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, कृति खरबंदा आणि सौरभ शुक्ला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: OMG ...! Urvashi Rautela Workout with 12-12 kg dumbbells, see her video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.