आगे आगे देखो होता है क्या ! सात महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या अनुष्का शर्माचे पुन्हा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 11:07 AM2020-11-27T11:07:32+5:302020-11-27T11:08:06+5:30

अनुष्का शर्माने यावेळी तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत होता. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मूडमध्ये दिसली, कधी एक्सायटेड तर कधी फोनमध्ये बिझी होती.

OMG! Anushka Sharma opts for comfy mini dress with sneakers During 7th Month Pregnancy | आगे आगे देखो होता है क्या ! सात महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या अनुष्का शर्माचे पुन्हा फोटो व्हायरल

आगे आगे देखो होता है क्या ! सात महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या अनुष्का शर्माचे पुन्हा फोटो व्हायरल

googlenewsNext

प्रेग्नेसी दरम्यान सोशल मीडियावर अनुष्का मोठ्या प्रमाणात ऍक्टिव राहिली आहे. आता तिने कामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रेेग्नसी दरम्यानही अनुष्का शर्मा तिच्या हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रभावित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तिच्या प्रत्येक लूकची नेहमीच चर्चा रंगत असते.  प्रेग्नंसीदरम्यान अनुष्का अधिक स्टायलिश बनली आहे. तिचे नवीन नवीन ड्रेसिंग स्टाइल बघून चाहत्यांनाही कधीच कंटाळा आला नसणार. करिना कपूर खान नंतर अनुष्का शर्मानेही तिची प्रेग्नंसी अधिक ग्लॅमरस केली आहे.

 

 लॉकडाऊनमध्ये काही अभिनेत्री पूर्णपणे गायब झाल्या होत्या, यावेळीही अनुष्का मात्र  तिच्या चाहत्यांना फॅशन गोल सेट करत होती. बहुतेक अभिनेत्रींनी प्रेग्नंसीमध्ये त्यांच्या कामातून ब्रेक घेत असताना अनुष्काने मात्र तसे न करता काम करत राहण्याला प्राधान्य दिले आहे. अनुष्काने यावेळी तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत होता. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मूडमध्ये दिसली, कधी एक्सायटेड तर कधी फोनमध्ये बिझी होती.


अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आईबाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्का आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय. पोलका डॉच फ्रिल ड्रेसपासून ते डंगरीपर्यंत अनुष्काच्या वॉर्डरोब एकापेक्षा एक सुंदर फॅशनेबल मॅटर्निटी ड्रेस पाहायला मिळत आहेत.

अनुष्का शर्मा पोहोचली विराट कोहलीला सपोर्ट करायला, दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना

अनुष्काने अलीकडेच दुबईमध्ये विराटचा बर्थ डे सेलिब्रेट केला. अनुष्काने आरसीबीच्या टीमसोबत विराटच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन केले. तर अनुष्काने विराटसोबचा रोमाँटिक फोटो शेअर केला होता. विराट अनुष्काची विशेष काळजी घेतोय.नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. विराट मैदानात, तर अनुष्का स्टेडियममध्ये. त्यामुळे दोघांमध्ये खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद झालाय.मैदानात आपल्या संघासोबत असलेला कोहली अनुष्काला 'जेवलीस का?' विचारतोय. त्यावर अनुष्का हसत हसत थम्स अप करून 'हो' असं उत्तर देतेय. विराट कोहली आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दोघेही कामाव्यतिरिक्त त्यांचा क्वॉलिटी टाईमही एन्जॉय करताना पाहाला मिळतात. जानेवारीत आम्ही दोनाचे तीन होऊ, अशी घोषणा दोघांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून केली आहे.

Web Title: OMG! Anushka Sharma opts for comfy mini dress with sneakers During 7th Month Pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.