नुसरतच्या हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनची किंमत वाचून तुम्हीही चक्रावाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:54 AM2020-03-09T11:54:30+5:302020-03-09T11:56:26+5:30

नुसरतने परिधान केलेल्या या आकर्षक अशा हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळालं.

Nushrat Bharucha Green High Slit Gown Prize Will Make You Shocked-SRJ | नुसरतच्या हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनची किंमत वाचून तुम्हीही चक्रावाल !

नुसरतच्या हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनची किंमत वाचून तुम्हीही चक्रावाल !

googlenewsNext

एका सोहळ्यात हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊन परिधान करत नुसरतने एंट्री घेताच सा-यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. विशेष म्हणजे हा ड्रेस अभिनेत्रींनी परिधान करणे काही नवीन नाही. याहूनही भन्नाट ड्रेसिंग स्टाइल करत सेलिब्रेटी सोहळ्यात हजेरी लावताना दिसतात. मात्र नुसरतच्या या ड्रेसवर नेटीझन्सनेही संमिश्र प्रतिक्रीया देत तिचा अंदाजाला नापसंती दर्शवली आहे.  विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राही अशाच प्रकारच्या हाई-स्लिट गाऊनमुळे चर्चेत होती. प्रियंकाची तुफान चर्चा झाली. त्यामुळे आता पब्लिसिटी मिळवण्यासाठी सगल्याच अभिनेत्री अता असा प्रकारचे ड्रेसिंग करत पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नुसरतनेही प्रियंकाच्या ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करत सा-यांचे आकर्षित केले आहे. तर दुसरीकडे नुसरतने घातलेला हा हॉट गाऊन तिने उचलेले एक धाडसी पाऊलच म्हणावे लागेल असेही स्तुती सुमनं तिच्यावर उधळत आहेत. 

बोल्ड आउटफिट परिधान करणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही त्यासाठी मोठे धाडसी आणि आत्मविश्वास  असावा लागतो अशी प्रतिक्रीया  बिग बॉस 13 की एक्स कंटेस्टेंट मधुरिमा तुलीनेही नुसरतच्या या ड्रेसवर दिली आहे. तुर्तास सेलिब्रेटींच्या महागडे ड्रेस हे नेहमीच चर्चेत असतात त्यासोबतच त्यांच्या डेसची किंमतही अधिक असते. नुसरतने घातलेल्या या ड्रेसची किंमतही 2 लाखच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.


नुकतंच सोशल मीडियावर नुसरतने  पुलमध्ये चिल करताने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यांत तिचा हॉट आणि बोल्ड अंदाजा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोटोत बिकीनीमध्ये पाहायला मिळते आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते एकसे बढकर एक कमेंटस आणि लाईक्स देत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
 

Web Title: Nushrat Bharucha Green High Slit Gown Prize Will Make You Shocked-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.