'डान्स दीवाने 3'च्या मंचावर नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी, व्हिडीओ तूफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:40 PM2021-05-06T15:40:44+5:302021-05-06T15:41:40+5:30

नोरा फतेहीच्या डान्स स्टाईलचे लाखो दिवाने आहेत.

Nora fatehi sets the stage on fire with her lavani dance on garmi song in dance deewane 3 | 'डान्स दीवाने 3'च्या मंचावर नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी, व्हिडीओ तूफान व्हायरल

'डान्स दीवाने 3'च्या मंचावर नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी, व्हिडीओ तूफान व्हायरल

googlenewsNext

नोरा फतेही एका जबरदस्त (Nora Fatehi)  डान्सर आहे. कोणत्याही प्रकारचा डान्स ती अगदी सहजपणे करते. त्याच्या डान्स मुव्ह्ज बघून सर्वांच थक्क झाले. नोरा फतेहीच्या अनोख्या डान्स स्टाईलचे लाखो दिवाने आहेत. आता नोरा फतेहीचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती 'हाय गर्मी' (Nora Fatehi lavani dance on garmi song) गाण्यावर लावणी करताना दिसतेय.  

या व्हिडिओ 'डान्स दीवाने 3' चा आहे, जो कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नोरा फतेही या शोमध्ये जजची भूमिका साकारते आहे. 'डान्स दीवाने 3' (Dance Deewane 3)  ची स्पर्धक सुचनाने लावणी सादरी केली ती पाहून नोरा थक्क झाली. सुचनाने केली लावणी पाहून फक्त तिचे कौतुक केला नाही तर तिच्यासोबत लावणी करण्याची इच्छा व्यक्त केली.  

यानंतर नोरा फतेही उठली आणि स्टेजवर गेली आणि तिने 'गर्मी' गाण्यावर लावणी करण्यास सुरुवात केली. नोरा फतेहीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता. याशिवाय ‘स्त्री’ सिनेमातील ‘कमरिया’ आणि जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ सिनेमात ‘ओ साकी साकी’ या हिट गाण्यांमध्ये तिने रसिकांची मनं जिंकली होती.

Web Title: Nora fatehi sets the stage on fire with her lavani dance on garmi song in dance deewane 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.