दिवंगत अभिनेता निर्मल पांडेला काम न देण्याचा आरोप होताच भडकले सुधीर मिश्रा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:14 PM2020-06-28T15:14:48+5:302020-06-28T15:16:52+5:30

आऊटसाइडर असल्यामुळे निर्मल पांडेला सुधीर मिश्रा सारख्या अनेकांची हेटाळणी सहन करावी लागली, असा आरोप लेखिका शेफाली वैद्यने ट्विटमधून केला.

nepotism sudhir mishra accused of not giving work to the actor nirmal pandey | दिवंगत अभिनेता निर्मल पांडेला काम न देण्याचा आरोप होताच भडकले सुधीर मिश्रा, म्हणाले...

दिवंगत अभिनेता निर्मल पांडेला काम न देण्याचा आरोप होताच भडकले सुधीर मिश्रा, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देया संपूर्ण वादात सुधीर यांना अनुराग कश्यप आणि हंसल मेहता यांचा पाठींबाही मिळाला.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक लोकांवर नेपोटिजमचा आरोप होत आहे. सुशांतसोबतच त्याच्याआधी जगाला अलविदा म्हणणा-या काही कलाकारांबद्दलही बोलले जात आहे. गत मंगळवारी दिवंगत इंदर कुमारची पत्नी पल्लवीने करण जोहर व शाहरूख खानवर आरोप केले होते. करण व शाहरूख यांनी माझ्या पतीला काम दिले नाही, असे तिने म्हटले होते. पल्लवीच्या पाठोपाठ आता लेखिका शेफाली वैद्य हिने दिवंगत अभिनेता निर्मल पांडे याच्यासाठी आवाज उठवला आहे.
बॉलिवूडमध्ये आऊटसाइडर असल्यामुळे निर्मल पांडेला सुधीर मिश्रा सारख्या अनेकांची हेटाळणी सहन करावी लागली, असा आरोप तिने ट्विटमधून केला आहे.

काय म्हणाली शेफाली

‘निर्मल पांडेला आठवा. नैनीतालचा तो प्रतिभावान अभिनेता, ज्याने बँडिट क्वीन आणि इस रात की सुबह नहीं सारख्या चित्रपटात काम केले होते. त्यालाही आऊटसाइडर आहे म्हणून सुधीर मिश्रा सारख्या लोकांनी सापत्न वागणूक दिली. काम मिळत नसल्याने तो आतून तुटला होता. वयाच्या 48 व्या वर्षी हार्ट अटॅकने त्याचे निधन झाले होते,’ असे ट्विट शेफालीने केले.

सुधीर मिश्रांनी दिले उत्तर


शेफालीच्या आरोपावर दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी लगेच उत्तर दिले. ‘इस रात की सुबह नहीं कोणी दिग्दर्शित केला होता, कोणी? कोणी?’, असा खोचक प्रश्न सुधीर मिश्रांनी शेफालीच्या आरोपाला उत्तर देताना केला. सुधीर यांच्या ट्विटनंतर शेफालीने प्रतित्त्युर दिले.

 ‘आणि मग? तुम्ही कधीच निर्मल पांडेला भेटला नाहीत, ना त्याला कॉल केला़ या चित्रपटानंतर वर्षभर तो कामासाठी स्ट्रगल करत राहिला. तेव्हा तुम्हाला रिअ‍ॅलिटी चेकची गरज का वाटली नाही?,’ असे तिने लिहिले. इतकेच नाही तर शेफालीने सुधीर यांच्या मुलाखतीची एक क्लिपही शेअर केली. यात सुधीर मिश्रा निर्मलच्या मृत्यूवर बोलताना दिसत आहेत.

 यावर सुधीर मिश्रा यांनी पुन्हा ट्विट केलेत. ‘केवळ मी गाजावाजा करत नाही, याचा अर्थ हा नाही की माझ्याकडे काहीही नाही. प्लीज, माहिती काढ की, मी किती नव्या लोकांना ब्रेक दिला आहे. चित्रपटांत नाही तर टीव्हीवरही आणि यात केवळ कलाकारच नाहीत..,’ असे त्यांनी लिहिले.
या संपूर्ण वादात सुधीर यांना अनुराग कश्यप आणि हंसल मेहता यांचा पाठींबाही मिळाला. शेफाली वैद्य सारख्या लोकांकडे दुर्लक्ष कर, हे सगळे आपल्याला ख-या मुद्यांपासून भटकवण्यासाठी आहे़, असे अनुराग कश्यपने लिहिले. 

Web Title: nepotism sudhir mishra accused of not giving work to the actor nirmal pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.