neha kakkar on her break up with himansh kohli i think its nobodys fault | नेहा कक्करला प्रेमाचे भरते! हिमांश कोहलीचा असा केला बचाव!!
नेहा कक्करला प्रेमाचे भरते! हिमांश कोहलीचा असा केला बचाव!!

गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले. गेल्या अनेक दिवसांपासून या ब्रेकअपची चर्चा आहे. या ब्रेकअपनंतर नेहा सैरभैर झाली. ब्रेकअपच्या दु:खातून सावरायला तिला बराच वेळ लागला. पण आता ती यातून पूर्णपणे बाहेर पडली. अगदी ताज्या मुलाखतीत, हिमांशसोबत ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासाही तिने केला. मी त्याला वेळ देत नाही, अशी त्याची तक्रार होती, असे तिने सांगितले.

केवळ इतकेच नव्हे तर जो माझ्या योग्यतेचाच नव्हता, त्याच्यावर मी माझा अमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली, असे सांगत हिमांशसोबतचे ब्रेकअप ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट असल्याचेही ती म्हणाली. नेहाच्या या मुलाखतीनंतर या ब्रेकअपसाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिमांशला जबाबदार ठरवले. पण मीडियाच्या बातम्या पाहून नेहा पुन्हा खवळली. तिला पुन्हा हिमांशचा पुळका आला. मग काय, सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिने मीडियावरचा संताप बोलून दाखवला.

डियर मीडिया, आमचे बे्रकअप घाणेरड्या पद्धतीने झालेले नाही. ना आमच्या नात्यात कुठली कटुता होती. तुम्ही सरसकट कुणावरही आरोप करू नका. माझ्या मते, या ब्रेकअपमध्ये कुणाचाही दोष नव्हता. कदाचित परमेश्वराचं आमचे नाते मान्य नव्हते. काहीही लिहून नकारात्मकता पसरवू नका. चांगले ते द्या आणि सकारात्मकता पसरवा, असे तिने लिहिले. हिमांश माझ्या योग्यतेचा नव्हता, असे म्हणणा-या नेहाने असा यु टर्न का घ्यावा, हे कळायला सध्या मार्ग नाही. नेहा या ब्रेकअपमधून बाहेर आली की अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय, हे तीच जाणो.

Web Title: neha kakkar on her break up with himansh kohli i think its nobodys fault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.