​मुमताज यांना ओळखणेही झाले कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2017 08:25 AM2017-05-04T08:25:38+5:302017-05-04T13:55:38+5:30

कधीकाळी आपल्या चंचल अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री मुमताज आठवतेय? होय, ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्याबद्दलच आम्ही बोलतोय. सुपरस्टार राजेश ...

Mumtaz too hard to recognize! | ​मुमताज यांना ओळखणेही झाले कठीण!

​मुमताज यांना ओळखणेही झाले कठीण!

googlenewsNext
ीकाळी आपल्या चंचल अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री मुमताज आठवतेय? होय, ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्याबद्दलच आम्ही बोलतोय. सुपरस्टार राजेश खन्नासोबतची मुमताज यांची आॅनस्क्रीन जोडी चांगलीच गाजली होती. मुमताज यांना पडद्यावर पाहणे, एक आनंददायी अनुभव होता. गेल्या अनेक वर्षांपासून मुमताज बॉलिवूडमध्ये दिसलेल्या नाहीत. पण काल-परवा मुमताज यांचा एक अगदी ताजा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून, याच मुमताज, हे तुम्हाला सांगूनही पटणार नाही. होय, या फोटोतील मुमताज यांना ओळखणेही कठीण झाले आहे. अर्थात त्यांच्या या बदललेल्या रूपामागे त्यांचे आजारपण आहे.



हा फोटो लंडनमधला आहे. सध्या मुमताज लंडनमध्ये असतात. याचठिकाणी त्या स्थायिक झाल्या आहेत. याठिकाणी त्यांच्यावर आजारावर उपचार सुरु आहेत. मुमताज यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे नाव ऐकताच मुमताज मनातून हादरून गेल्या होत्या. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झालेत. कॅन्सरवरील उपचार म्हणून त्यांना केमोथेरपी घ्यावी लागली.
केमोथेरपी आणि औषधांमुळे त्यांच्या डोक्यावरील सगळे केस निघून गेले.  त्यांना घराबाहेर पडणेही कठीण झाले. या आजारपणात मुमताज यांना त्यांच्या घरच्यांनी सोबत केली. मुमताज यांचे पती मयुर यांनी त्यांची प्रचंड काळजी घेतली. डोक्यावरचे केस गेल्यानंतर मयुर यांनी मुमताज यांच्यासाठी विग आणला. पण हे विग घालून मिरवणे, मुमताज यांच्या मनाला पटणारे नव्हते. त्यांनी यास्थितीत समोर येईल ते वास्तव स्विकारायचे ठरवले आणि अतिशय धीराने त्या या आजारपणाला सामो-या गेल्या.  हा ताजा आणि हसरा फोटो त्याचाच परिणाम आहे. मुमताज यांच्या या धाडसाला सलाम आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!

Web Title: Mumtaz too hard to recognize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.