mother Neetu Kapoor spoke up about the reasons of Ranbir Kapoor's failed relationships | म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

ठळक मुद्देरणबीर कपूर कधीकाळी  दिपिका पादूकोणसोबत रिलेशनशिप मध्ये होता, अनेक वर्षे त्यांचे अफेअर सुरू होते. पण कतरिना कैफची एन्ट्री झाली आणि रणबीरने दीपिकाला सोडले.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) म्हणजे बॉलिवूडचा प्लेबॉय. सिनेमांपेक्षाही रणबीर त्याच्या अफेअर्समुळे  अधिक चर्चेत राहीला आहे. अगदी करिअरला सुरूवात केली आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. दीपिका पादुकोण, कतरिना कैफ यांच्यासोबत रणबीर सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. रणबीरचे पहिले प्रेम होते, अवंतिका मलिक. पण या प्रत्येकीसोबत त्याचे ब्रेकअप झाले आणि यासाठी रणबीरला दोषी ठरवण्यात आले. प्रामाणिक नसणे आणि कमिटमेंट्साठी तयार नसणे हे त्याच्या प्रत्येक ब्रेकअपचे कारण सांगितले गेले. पण रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचे मानाल तर लेकाचा अतिहळवा स्वभाव या सर्व ब्रेकअपसाठी जबाबदार होता. (Ranbir Kapoor's failed relationships)
नीतू  एका मुलाखतीत रणबीरच्या अयशस्वी रिलेशनशिपवर  बोलल्या होत्या.

काय म्हणाल्या होत्या नीतू कपूर...
या मुलाखतीत नीतू यांनी रणबीरचा चांगलाच बचाव केला होता. रणबीर कमालीचा हळवा मुलगा आहे. त्यामुळे मुलींना नाही म्हणणे त्याच्या स्वभावात नाही.  त्याला मुलींना नाही म्हणता येत नाही आणि त्यामुळेच तो चुकीच्या नात्यात अडकतो. तो खूप हळवा आहे. तो कोणालाही दुखवू शकत नाही. त्याच्या अफेअर्स बाबतीत हेच घडते. यामुळे तो चुकीच्या नात्यात अडकतो. नाही म्हणता येत नसल्याने हे चुकीचे नाते पुढे जात राहते. मी हे होतांना पाहिले आहे आणि मी काहीच करू शकत नाही. जेव्हा तो पहिल्यांदा प्रेमात पडला, तेव्हाही मला माहित होत ती मुलगी योग्य नाही. पण जेव्हा मी त्याला समजवायला गेले, तो भांडू लागला. तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने प्रकरण हाताळायला शिकले. तो खूप प्रतिभावान आहे, पण त्याच बरोबर तो लाजाळू देखिल आहे. मी त्याला कधीच स्वत:हून मुलींकडे जाताना पाहिले नाही. मुली स्वत:हून त्याच्याकडे येतात आणि तो खूप हळवा असल्याने नाही म्हणत नाही आणि मग नात्यात अडकतो असे त्या म्हणाल्या होत्या.

कुठल्याही रिलेशनशिपमध्ये इतक्या लवकर सीरिअस होऊ नकोस. वेळ दे, समोरच्या व्यक्तिला ओळख, वेळ घालव पण कमिट करू नकोस. पटले नाही तर स्पष्ट तसे सांग, असे मी त्याला समजावल्याचेही त्यांनी सांगितले होते.
तुम्हाला माहित आहे की, रणबीर कपूर कधीकाळी  दिपिका पादूकोणसोबत (Deepika Padukone) रिलेशनशिप मध्ये होता, अनेक वर्षे त्यांचे अफेअर सुरू होते. पण कतरिना कैफची (Katrina Kaif) एन्ट्री झाली आणि रणबीरने दीपिकाला सोडले. कतरिनासोबत तर रणबीर लिव्ह इनमध्येही होता. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. सध्या रणबीर आलिया भटला डेट करतोय. दोघेही लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे.
   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mother Neetu Kapoor spoke up about the reasons of Ranbir Kapoor's failed relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.