मिथुन चक्रवर्तीने कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, स्वतःच्या मुलीप्रमाणे केलाय सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:04 PM2020-05-09T19:04:37+5:302020-05-09T19:06:04+5:30

दिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता.

Mithun Chakraborty's untold story of adopting a girl child PSC | मिथुन चक्रवर्तीने कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, स्वतःच्या मुलीप्रमाणे केलाय सांभाळ

मिथुन चक्रवर्तीने कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, स्वतःच्या मुलीप्रमाणे केलाय सांभाळ

googlenewsNext
ठळक मुद्देमिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले. दिशानी प्रचंड स्टायलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्यात आहेत.

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती अखेर बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. होय, गेल्या काही महिन्यांपासून दिशानीच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अर्थात अद्याप दिशानीच्या डेब्यूची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार, असे कळतेय. दिशानी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज आपले नव नवे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोतील तिच्या अदा पाहून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास ती अगदी तयार असल्याचे दिसतेय.

दिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता. त्या रस्त्यावरून अनेकजण गेलेत. पण जीवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या चिमुकलीला पाहून कुणाचेही हृदय द्रवले नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आणि मिथुनने नेमकी ही बातमी ऐकून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

मिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले. दिशानी प्रचंड स्टायलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्यात आहेत. दिशानीशिवाय मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत.बॉलिवूडमध्ये येण्यास आतूर असलेली दिशानी बॉलिवूड चित्रपटांची मोठी चाहती आहे. सलमान खानचीही ती खूप मोठी चाहती आहे. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीत अ‍ॅक्टिंग शिकतेय. दिशानी सोशल मीडियावरही कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात फोटोंमध्ये ती न्यूयॉर्क फिल्म अकादमीच्या फ्रेन्ड्ससोबत दिसतेय.

Web Title: Mithun Chakraborty's untold story of adopting a girl child PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.