Manoj Bajpayee on Kangana Ranaut bollywood drugs statement says there is vested interest | कंगनाला मनोज वाजपेयीचं 'सडेतोड उत्तर', म्हणाला - जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे!

कंगनाला मनोज वाजपेयीचं 'सडेतोड उत्तर', म्हणाला - जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे!

कंगना रणौत सध्या तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलीच चर्चेत आहे. बीएमसी आणि शिवसेनेसोबतच्या वादासोबतच कंगना इंडस्ट्रीबाबतही असं खूप काही वाईट बोलत आहे जे अनेकांना अजिबात आवडलेलं नाही. कंगनाने काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात संपूर्ण इंडस्ट्रीला दोषी ठरवलं होतं. कंगनाने ट्विट केले होते की, इंडस्ट्रीतील पार्टीजमध्ये कोकेन सर्वात पॉप्युलर ड्रग आहे. कंगनाने लिहिले होते की, या पार्टीजमध्ये पाण्यात MDMA मिश्रित करून दिलं जातं. तेही तुम्हाला न सांगता. आता या पूर्ण प्रकरणावर अभिनेता मनोज वाजपेयीने उत्तर दिलं आहे. तेही मार्मिकपणे.

'जे घडतंय त्यात स्वार्थ'

इंडिया टुडेसोबत बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला की, 'हे फारच चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीला जनरलाइज करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं यामागे कुणाचातरी स्वार्थ आहे. मी मुळात इंडस्ट्री ला डिफेंड करत नाहीये. पण इथे वाईट लोक आहेत तर काही चांगलेही लोक आहेत'.

मनोज वाजपेयी पुढे म्हणाला की, 'इथे प्रत्येक प्रकारे लोक आहेत. मला वाईट लोकही भेटतात. पण त्यांना न भेटताही मी त्यांच्याशी डील करतो. त्यांच्याशी भांडतो आलोय आणि भांडत राहणार. पण जसे इतर क्षेत्रात आहेत तसेच लोक इथेही आहेत. मात्र, जसं तुम्ही म्हणता की, इथे ड्रग्सचा व्यापार आहे. तर जे लोक  हे बघत आहेत ते मला बघतात. आणि त्यांना वाटतं की, ड्रग्सची गोदाम येत आहे. त्यांना असं वाटतं की, जणू मनोज वाजपेयी कांचा सेठ आहे'.

'इथे काही चुकीचं होतं आहे'

मनोज वाजपेयी म्हणाला की, 'मला वाटतं जे काही सुरू आहे त्यात कुणाचातरी स्वार्थ आहे. जे बोललं जात आहे त्यात अनेक कारणं दडलेली आहे. 'शूल' सिनेमात माझा एक डायलॉग होता की, कुछ गलत हो रहा है यहां, अंधे हैं आपलोग जो आपको ये दिखाई नहीं देता है. आणि मला आज सर्वांना सांगायचंय की, हे जे दाखवलं जात आहे. गोष्ट केवळ तेवढी नाहीये. हे एखाद्या उद्देशाने केलं जात आहे. हा उद्देश शोधावा लागेल'.

सुशांतच्या मृत्यूवर उठवला होता आवाज

दरम्यान, मनोज वाजपेयी अशा काही निवडक कलाकारांपैकी एक आहेत जो सुशांतच्या मृत्यूनंतर म्हणाला होता की, तो आत्महत्या करू शकत नाही. नक्कीच यामागे काहीतरी षडयंत्र आहे. मनोज वाजपेयी तेव्हा म्हणाला होता की, जर ही आत्महत्या असेलही तरी याचा तपास केला गेला पाहिजे की, असं काय कारण होतं की, त्याने आत्महत्या केली.

हे पण वाचा :

शो बिझनेस विषारी! कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा...

चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल

करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Manoj Bajpayee on Kangana Ranaut bollywood drugs statement says there is vested interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.