ठळक मुद्देकरिअरमुळे जवळपास 12 वर्षे मंदिरा आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण काय तर प्रेग्नंट राहिल्यास करिअर संपेल अशी भीती तिला होती. 

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिने वयाची चाळीशी ओलांडलीय. म्हणायला ती 48 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणाला विश्वास बसणार नाही. मंदिराची फिट बॉडी पाहून ती 47 वर्षांची आहे, हे पहिल्या नजरेत मनाला पटत नाही. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. सध्याही ती अशाच फोटोंमुळे ट्रोल होतेय.

मंदिराने तिचे साडीवरचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि हे फोटो शेअर करताच लोकांनी तिला फैलावर घेतले. अर्थात काही लोकांना तिचा लूक आवडला. मात्र काही लोकांना तिचा हा ओव्हर स्टाईलिश लूक आवडला नाही. या सर्वांनी तिला ट्रोल केले.
ही साडी आहे, बिकिनी आहे की लुंगी? असा सवाल करत युजर्सनी तिला नाही नाही ते सुनावले. अशी साडी नेसून कोणी कोणासमोर कसे जाऊ शकेल? असे एका युजरने लिहिले.

मंदिरा याआधी तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाली आहे. मात्र या ट्रोलिंगचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. हेच कारण आहे की, तिने कधीच स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणे सोडले नाही.
 या वयातही मंदिरा कमालीची फिट आहे. फिट राहण्यासाठी मंदिरा केवळ जिमवर अवलंबून नाही. स्वीमिंग, योगा असे सगळे काही ती करते. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते. 

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला 9 वर्षांचा मुलगा आहे. अलीकडे मंदिरा ‘साहो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.

म्हणून 12 वर्षे आई झाली नाही...
करिअरमुळे जवळपास 12 वर्षे मंदिरा आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण काय तर प्रेग्नंट राहिल्यास करिअर संपेल अशी भीती तिला होती. यामुळे लग्नानंतरही 12 वर्षे तिने बाळ होऊ दिले नाही. ‘ माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिले नाही. मी प्रेग्नेंट राहिले तर माझे करिअर संपेल़, अशी भीती मला होती. माझ्या पतीने माझ्या या निर्णयाचा आदर केला. त्याचमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला, असे मंदिराने एका मुलाखतीत सांगितले होते.

मंदिरा बेदीनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mandira bedi trolled brutally for her look in saree see actress latest photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.