malayalam singer biju narayanan wife sreelatha narayanan passes awa due to cancer | दिग्गज गायक बीजू नारायणन यांच्या पत्नीचे निधन 
दिग्गज गायक बीजू नारायणन यांच्या पत्नीचे निधन 

ठळक मुद्देबीजू नारायणन हे साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज पार्श्वगायक आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

मल्याळम सिंगर बीजू नारायणन यांच्या पत्नी श्रीलता नारायणन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या 44 वर्षांच्या होत्या. श्रीलता या कॅन्सरने ग्रस्त होत्या. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
बीजू आणि श्रीलता सुमारे 21 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. 23 जानेवारी 1998 रोजी दोघांना विवाह झाला. त्याआधी एर्नाकुलमच्या महाराज कॉलेजात दोघेही एकाच वर्गात शिकत होते. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे प्रेम. यानंतर बीजू व श्रीलता यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गत जानेवारीत दोघांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. बीजू यांनी या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


बीजू नारायणन हे साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज पार्श्वगायक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ एक डीजे आहे. तो डीजे डम्ब्लो नावाने लोकप्रिय आहे. तर लहान मुलगा सूर्या वकीलीचा अभ्यास करतोय. पण यासोबत त्यालाही संगीतात रूची आहे.
बीजू यांनी ‘वेनकलम’ या चित्रपटापासून आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली होती. आत्तापर्यंत त्यांनी 400 वर गाणी गायली आहे.


Web Title: malayalam singer biju narayanan wife sreelatha narayanan passes awa due to cancer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.