अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. यादरम्यान मलायकाने इंस्टाग्रामवर जुना बोल्ड फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


मलायका अरोराने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर जुना ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने हातात पदर घेऊन धावताना दिसते आहे. हा खूप बोल्ड फोटो असून तिने हा फोटो शेअर करत धाव मल्ला धाव असे कॅप्शन दिले आहे. जुन्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. मलायकाच्या या फोटो तिच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील कमेंट्स करत आहेत. तिच्या या फोटोवर कतरिनाने माझे आवडते फोटोशूट असल्याचे म्हटले आहे. 


मलायका अरोरा बऱ्याचदा अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ साली घटस्फोट झाला होता. मात्र मलायका २०१६पासून वेगळी रहायला लागली होती. दोघांना एक मुलगा आहे अरहान खान ज्याची कस्टडी मलायकाला मिळाली आहे.


दोघेही वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती.


एका चॅनेलच्या एका मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला माहित आहे आणि संपूर्ण कुटुंबाला माहित आहे. मी मॅच्युअर आहे जे करेन ते योग्य करेन.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Malaika Arora's throw back bold photo hits social media, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.