व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 12:49 PM2021-02-08T12:49:26+5:302021-02-08T12:50:15+5:30

फोटो आणि या फोटोसोबतचे कॅप्शन...

malaika arora blushing on valentines week is arjun kapoor expressing his love | व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले होते.

बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करतात. आता मलायकाने एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोचे अर्जुन कपूरसोबत असलेले कनेक्शन शोधून काढलेय. हा फोटो आणि या फोटोसोबतचे कॅप्शन अर्जुनसाठी आहे, हे कळायला चाहत्यांना वेळ लागला नाही.

शेअर केलेल्या या फोटोत मलायका लाजताना दिसतेय. ‘तुझ्यामुळे ब्लश करते बेबी,’ असे कॅप्शन मलायकाने या फोटोला दिले आहे. कॅप्शनमध्ये मल्लाने कुठेही अर्जुन कपूरचा उल्लेख केलेला नाही. पण तिची ही पोस्ट अर्जुनसाठीच आहे, हे मात्र नक्की. 
अर्जुन व मलायका यांच्यात वयात बरेच अंतर आहे. पण वय दोघांसाठीही नुसता एक आकडा आहे. 2019 मध्ये अर्जुनने मलायकासोबतचे नाते आॅफिशिअल केले होते. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकने अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत त्याला विश केले होते.

शेअर केले होते हॉट फोटो
 अलीकडे मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले होते.  डिझाईनर अर्पिता मेहताच्या ‘द मिरर’ या कॉफी टेबल बुकसाठी मलायकाने हे बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोत मलायका मोरपंखी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली होती.  मलायकाच्या या फोटोंना केवळ 3 तासांत साडे तीन लाख लाईक्स मिळाले होते. आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो, कडक, स्टनिंग अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या होत्या.

त्याआधी मलायकाने व्हाईट शर्टमधील स्टनिंग फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटोही क्षणात व्हायरल झाले होते. मलायका अरोरा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला गेली होती. तेव्हाही तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर असेच व्हायरल झाले होते. बिकनीतील तिच्या हॉट फोटोंना चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती.  

Web Title: malaika arora blushing on valentines week is arjun kapoor expressing his love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.