बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही लकी अलीची दुसरी मुलगी, फोटो पाहून म्हणाल - बॉलिवूडमध्ये ये गं बाई....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:10 PM2021-10-14T16:10:17+5:302021-10-14T16:13:28+5:30

नफीसा अली यांनी साराचे काही फोटो शेअर करत लिहिले की, 'ही सारा अली आहे. लकी अलीची दुसरी मुलगी. या फोटोत सारा फार सुंदर दिसते. नफीसाचे फॉलोअर्स तिचं कौतुक करत आहेत.

Lucky Ali beautiful daughter Sara Inaar Ali see her beautiful photos | बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही लकी अलीची दुसरी मुलगी, फोटो पाहून म्हणाल - बॉलिवूडमध्ये ये गं बाई....

बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही लकी अलीची दुसरी मुलगी, फोटो पाहून म्हणाल - बॉलिवूडमध्ये ये गं बाई....

googlenewsNext

गायक-संगीतकार लकी अली (Lucky Ali) सोशल मीडियावर जास्त फार जास्त अॅक्टिव नाही. पण त्यांची जवळची मैत्रीण नफीसा अली सोधी सतत लकी अलीसंबंधी अपडेट शेअर करत असते. अभिनेत्री नफीसा अली सोधीने लकी अलीची दुसरी मुलगी सारा इनारा अलीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

नफीसा अली यांनी साराचे काही फोटो शेअर करत लिहिले की, 'ही सारा अली आहे. लकी अलीची दुसरी मुलगी. या फोटोत सारा फार सुंदर दिसते. नफीसाचे फॉलोअर्स तिचं कौतुक करत आहेत. 

१९९६ मध्ये लकी अलीने मेघन जेन मॅक्लेरीसोबत लग्न केलं होतं. २००० साली त्याने अनाहितासोबत लग्न केलं होतं. नंतर २०१० मध्ये त्याने बंगळुरूमध्ये माजी मिस इंग्लंड केट एलिजाबेथ हॉलमसोबत लग्न केलं होतं. सारा इनारा लकी अली आणि अनाहिताची मुलगी आहे. गेल्यावर्षी लकी अलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात लकी अली गर्दीत ओ सनम गाणं गाताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ नफीसाने पोस्ट केला होता.

९०च्या दशकातील लोकांसाठी लकी अली हे नाव काही नवीन नाही. आजही त्याची गाणी आवडीने ऐकली जातात. लकी अली भलेही लाइमलाइटपासून दूर राहतो. पण फेस्टिव्हल सीझनमध्ये शोसाठी तो भरपूर पैसे घेतो. तो सध्या गोव्यात एकटा राहतो. त्याची तीन लग्ने झाली आहेत. एका वेबसाईटनुसार लकी अलीची एकूण संपत्ती ६ मिलियन डॉलर इतकी आहे. 
 

 

Web Title: Lucky Ali beautiful daughter Sara Inaar Ali see her beautiful photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.