अभिनेता कार्तिक आर्यनसारा अली खानचा बहुचर्चित चित्रपट 'लव्ह आज कल'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहताना तो दोन वेगवेगळ्या काळांमध्ये घेऊन जातो. प्रेमाचा काहीसा गोंधळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या रोमँटिक, कॉमेडी, ड्रामा असणाऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले आहे.

'लव्ह आज कल'च्या ट्रेलरमध्ये १९९० आणि २०२० मधल्या काळातील काहीशी टिपिकल आणि मॉर्डन लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.

प्रेमात असणाऱ्या कार्तिकची सारा आणि आरुषीसोबत मजेशीर केमिस्ट्री पहायला मिळतेय. 'लव्ह आज कल'मध्ये काही जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्यात आले आहे. तसेच कार्तिकचे सारा व आरूषीसोबत चित्रपटात बरेच किसिंग सीनही पहायला मिळत आहेत.

'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सीक्वल आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून सारा-कार्तिकच्या प्रेमाच्या, ब्रेकअपच्या अनेक चर्चा सुरु होत्या. यावर दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण आता बहुचर्चित असणारी सारा-कार्तिकची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Love Aaj Kal Trailer: Kartik Aryan-Sara Ali Khan's Romantic Chemistry and Extremely Bold Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.