‘स्टाइल में रहनेका’ हे चित्रपटातून वारंवार समाज मनावर बिंबवले जाते. कारण स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू असून इतरांना आकर्षित करण्यासाठी स्टाइल प्रभावी ठरते. अशाच महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील अजय देवगण, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराणा, क्रिती सॅनॉन, मलायका अरोरा, अमेय वाघ, शान, यामी गौतम व तापसी पन्नू हे कलाकार लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डला उपस्थिती लावून चारचाँद लावणार आहेत. सेलिब्रेटी रेड कार्पेटवर स्टाइलचा जलवा दाखवत सोहळ्यात चार चाँद लावतील.

यावेळी सेलिब्रेटींसह दिलखुलास गप्पाही रंगणार आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

अंजन-कांचन करवंदीचा काटेरी मुलुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची ‘लोकमत’ने करून दिलेली नवी स्टाइलिश ओळख सर्वार्थाने अभूतपूर्व ठरणार आहे.

महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डच्या दैदीप्यमान सोहळ्याची शान मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साक्षीने कमालीची खुलणार आहे. एकूणच अतिशय थाटामाटात रंगणाऱ्या या शानदार सोहळ्यात स्टाइलचा एक अनोखा दैदीप्यमान सोहळा डोळे दिपवून टाकणारा ठरणार हे मात्र नक्की. यावेळी त्यांच्या स्टाइलबरोबरच त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाथाही इतरांसाठी आदर्शवत ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019 : Most stylish personalities of Maharashtra will be honored today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.