गेल्या वर्षी रणवीरनं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. हे नातं टिकवण्याचा मंत्र दीपिकाने दिला. नवरा बायकोने एकमेकांना आणि कुटुंबीयांना वेळ दिला पाहिजे, असं तिनं बिझी जोडप्यांना सांगितलंय. 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात लोकमत समूहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरिअल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी दीपिकाची मुलाखत घेतली. त्यावेळी तिनं आपली फॅशन, करिअर, रणवीरसोबतचा संसार या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

रणवीर आणि तू एकत्र आल्यावर कसा वेळ सोबत घालवता? या प्रश्नावर दीपिका म्हणाली की, 'मी असा विचार करत नाही की, माझं जगणं इतरांपेक्षा वेगळं आहे. जसं इतरांचं असतं तसंच आमचं जगणं आहे. आपण सगळेच काम करतो. कामांमध्ये सतत बिझी असतो. पण तरी यातून आपण एकमेकांसाठी वेळ काढणं फार महत्वाचं आहे. फक्त दोघांसाठीच नाही तर परिवारातील सगळ्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांसाठी वेळ काढतो. आणखी एक म्हणजे आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने हे समजून घेतो की, कामासाठी काय काय करावं लागतं. त्यावरच आम्ही काम करत असतो'.

वेब सीरीजमधील बोल्डनेस

यावेळी वेब सीरीजमधील बोल्डनेसबाबतही दीपिकाने मनमोकळ्या गप्पा केल्या. ती बोल्डनेस बाबत म्हणाली की, 'मला त्यात काही गैर वाटत नाही. मुळात एखाद्या सीनमधील बोल्डनेसचा संदर्भ काय आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे. एखादा बोल्ड सीन बघताना फारच भडक वाटू शकतो. पण त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जेव्हा तुम्ही एक क्रिएटिव्ह व्यक्ती असता तेव्हा तुमच्यापुढे काय येतं त्यासाठी तुम्ही पूर्ण विचार करून बघितलं पाहिजे. त्यानुसारचा निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं माझ्या आयुष्यात घेतलेले सगळे निर्णय हे सहजभावनेतून घेतलेले आहे. मी माझ्या अंतःप्रेरणेला फॉलो करते'. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lokmat Most Stylish Award 2019 : Deepika Padukone talks about family and Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.