'लगान'मधील या अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे, ११ वर्षापासून आहे बेरोजगार; खायचेही वांधे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:17 PM2021-09-24T14:17:10+5:302021-09-24T14:20:46+5:30

मी लगानमधून माझ्या करिअरची सुरूवात केली होती. यात मी आमिर खानचा भाऊ गोलीच्या अपोझिट होते. माझ्या भूमिकेचं नाव केसरिया होतं.

Lagaan actress kesariya aka Parveena bano is seeking for financial help | 'लगान'मधील या अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे, ११ वर्षापासून आहे बेरोजगार; खायचेही वांधे

'लगान'मधील या अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे, ११ वर्षापासून आहे बेरोजगार; खायचेही वांधे

googlenewsNext

लगान'सिनेमात केसरियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परवीन बानो हिला २०११ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर परवीनच्या आरोग्यासंबंधी समस्या वाढल्या आहेत. आणि उपचारादरम्यान तिच्याकडचे बचत केलेले पैसेही संपले आहेत. आता तिच्याकडे औषध घेण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत.

आजतकसोबत बोलताना परवीना म्हणाली की, 'मी घऱात माझी छोटी मुलगी आणि बहिणींसोबत राहते. पतीपासून वेगळी झाल्यापासून घरात मी एकटीच कमावणारी होते. मी छोट्या-मोठ्या भूमिका करून पैसे कमवत होते. माझा भाऊ देखरेख करत होता. पण त्यालाही कॅन्सर झाला. मी लगानमधून माझ्या करिअरची सुरूवात केली होती. यात मी गोलीच्या अपोझिट होते. माझ्या भूमिकेचं नाव केसरिया होतं.

२०११ मध्ये आला होता ब्रेन स्ट्रोक

४२ वर्षीय परवीना पुढे म्हणाली की, २०११ मध्ये मला आर्थरायटिस झाला. ब्लड प्रेशरची समस्या झाली होती. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक आला. इतकंच काय तर पॅरालाइज स्ट्रोकही आला होता. गेल्या सात-आठ वर्षांपासून हेच प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यानंतरच माझी तब्येत बिघडत गेली. उपचारात सगळे पैसे गेले. तेव्हापासून मी काम न करता घरीच आहे. माझी बहीण असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होती.  ती कसातरी परिवार चालवत होती. पण लॉकडाऊनमुळे तिचंही काम गेलं. आता आमच्याकडे कमाईची साधन नाही.

मदतीसाठी कुणी आलं नाही

मी मदतीसाठी अनेक लोकांशी बोलले. पण कुणी काही मदत केली नाही. सिन्टा वाल्यांनी किराणा आणून दिला. राजकमलजी यांनीही दोनदा किराणा दिला. आजही माझ्यावर उपचार सुरू आहेत. मला दर आठवड्यात १८०० रूपयांचं औषध लागतं. घराचं भाडं आहे. लाइट बिल आहे. मला याचीच भीती होती की, इंडस्ट्रीत मी आजारी असल्याची बातमी पसरेल आणि मला काम मिळणं बंद होईल. मला इतकंच वाटतं की, उपचार चांगले झाले तर मी पुढे काम करू शकेन.

ती म्हणाली की, जर माझा उपचार आणि औषधांची व्यवस्था योग्य झाली तर मी पुन्हा कामावर परत येऊ शकेन. पण उपचार आणि औषधांच्या पैशांचा विचार करूनच जीव निघतो. ब्रेनवर पडलेल्या क्लॉट्स औषधांच्या मदतीने रिलीज केल्या जाऊ शकतात.

आजतकने अभिनेता सोनू सूदला परवीनाच्या कंडीशनबाबत सांगितलं की,  तर त्यांच्या टीमने लगेच परवीनाकडे एक महिन्याचा किराणा नेऊन दिला. तसेच तिच्या एक महिन्यांच्या औषधांचीही व्यवस्था करून दिली.
 

Web Title: Lagaan actress kesariya aka Parveena bano is seeking for financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.