ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

By अमित इंगोले | Published: October 17, 2020 10:28 AM2020-10-17T10:28:47+5:302020-10-17T10:42:58+5:30

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली.

Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush? | ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

Next

प्रभासचा आगामी सिनेमा 'आदिपुरूष' हा घोषणेपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. पण त्या अफवा ठरल्या. आता ताज्या रिपोर्टनुसार, या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी क्रिती सेननचं नाव सर्वात वर आहे.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, 'आदिपुरूष' मध्ये मुख्य भूमिकेत क्रिती सेनन दिसू शकते. पण याबाबत अजून काहीच अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या क्रिती सेनन 'Mimi' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा मराठी सिनेमा 'मला आई व्हायचंय' चा हिंदी रिमेक आहे. (तब्बल इतक्या कोटींमध्ये तयार होणार प्रभास-सैफ अली खानचा 'आदिपुरुष', बजेट वाचून व्हाल अवाक्)

'आदिपुरूष' हा खरंच येत्या वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहणारा सिनेमा ठरू शकतो. कारण या सिनेमात सैफ अली खान हा व्हिलनच्या म्हणजेच रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रभास हा रामाची भूमिका साकारणार आहे. तसेच चर्चा तर अशीही आहे की, या सिनेमात अजय देवगन भगवान शिवाची भूमिका साकारेल. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. दरम्यान, प्रभास सध्या इटलीमध्ये 'राधे श्याम' सिनेमाचं शूटींग करत आहे. या सिनेमात तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. ('आदिपुरूष' मध्ये प्रभास आणि सैफनंतर अजय देवगनची एन्ट्री? 'ही' भूमिका साकारणार असल्याची चर्चा....)

दिग्दर्शक ओम राऊत याच्या आधीच्या 'तान्हाजी' सिनेमात अजय देवगन आणि सैफ अली खान आमनेसामने आले होते. आता आदिपुरूषमध्येही ते एकत्र दिसले तर अर्थातच त्यांच्या फॅन्सना आनंद होईल. पण अजयच्या या सिनेमातील भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच सीताची भूमिका कोण साकारणार हेही कोडं बनूनंच आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app