Adipurush budget prabhas and saif ali khan movie to be made in 400 crore budget | तब्बल इतक्या कोटींमध्ये तयार होणार प्रभास-सैफ अली खानचा 'आदिपुरुष', बजेट वाचून व्हाल अवाक्

तब्बल इतक्या कोटींमध्ये तयार होणार प्रभास-सैफ अली खानचा 'आदिपुरुष', बजेट वाचून व्हाल अवाक्

दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी सिनेमा ‘आदिपुरुष’ गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ओम राऊतच्या सिनेमात प्रभास दिसणार आहे. प्रभास आणि ओम राऊतचा हा सिनेमाचा बजेट खूपच जास्त असल्याची चर्चा आहे. पिंकविला रिपोर्टनुसार 'आदिपुरुष'चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे.  पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे.

ओम राऊत म्हणाला, मी गेल्या अनेक दिवसांपासून यावर रिसर्च करत होतो आणि लॉकडाऊनने माझी खूप मदत केली. आदिपुरुषबाबत जी स्क्रिप्ट माझ्या डोक्यात होती सिनेमा तसाच तयार झाला आहे. मी एक वर्षापूर्वी लिहिले होते, परंतु आता आम्ही त्यात पुन्हा बरेच बदल केले आहेत. 'तन्हाजी द अनसंग वॉरियर'च्या यशानंतर, लोकांना 'आदिपुरुष'मध्ये व्हिजुअल्स पाहायला आवडतील. प्रभासपेक्षा चांगला हिरो आम्हाला या सिनेमासाठी मिळला नसता. 


भूमिकेसाठी खास तयारी
 बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे. ओम राऊत यांच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा लंकेशच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. 

सध्या आदिपुरूषचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू असून २०२१च्या सुरूवातीला सिनेमाचं शूटींग सुरू होण्याची चर्चा आहे. तसेच असाही अंदाज लावला जात आहे की, प्रभास आणि सैफ अली खानचा हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज केला जाईल. टी सीरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या सिनेमाची निर्मिती करत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Adipurush budget prabhas and saif ali khan movie to be made in 400 crore budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.