ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 05:45 PM2020-02-22T17:45:46+5:302020-02-22T17:49:15+5:30

या अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे.

Kriti Kharbanda slams an Indian airline for losing her luggage yet again | ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात...

ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात...

Next
ठळक मुद्देकृतिने ट्विटरवर नुकतेच ट्वीट करून लिहिले आहे की, माझे सामान पुन्हा एकदा हरवल्याबद्दल तुमचे खूप आभार... तुम्ही तुमच्या स्टाफला लोकांशी चांगल्याप्रकारे कशाप्रकारे वागायचे हे शिकवण्याची गरज आहे.

कृति खरंबदाला पुन्हा एकदा एअर इंडियाचा एक वाईट अनुभव आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून तिचे सामान हरवले असल्याने ती प्रचंड संतापली असून तिने सोशल मीडियाद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे.

कृतिने ट्विटरवर नुकतेच ट्वीट करून लिहिले आहे की, माझे सामान पुन्हा एकदा हरवल्याबद्दल तुमचे खूप आभार... तुम्ही तुमच्या स्टाफला लोकांशी चांगल्याप्रकारे कशाप्रकारे वागायचे हे शिकवण्याची गरज आहे.

कृतिच्या या ट्वीटवर लगेचच एअर इंडियाने रिप्लाय देत तिची माफी मागितली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आम्ही क्षमस्व आहोत... तुम्ही आम्हाला मेसेज करून तुमच्या फाइलचा रेफरन्स नंबर आणि बॅगेजचा टॅग नंबर द्या... तसेच तुम्ही कोणत्या विमानाने प्रवास केला याविषयी माहिती द्या... आम्ही आमच्या बॅग सांभाळणाऱ्या टीमकडून लवकरात लवकर चौकशी करतो...

एअर इंडियाच्या या ट्वीटवर कृतिने उत्तर दिले की, तुमची माफी स्वीकारायला मला नक्कीच आवडली असती. पण माझे सामान परत मिळेल अशी कोणतीच चिन्हं मला दिसत नाहीयेत. तुमच्या मुंबई किंवा गोवा टीमकडे इतकी देखील विनम्रता नाहीये की ते माझे सामान मला परत करतील.

कृतिच्या या ट्वीटवर काहीच वेळात एअर इंडियाने ट्वीट केले की, तुमचे सामान मुंबई विमानतळावरून गोव्याला आज पोहोचत आहे. तुमची बॅग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमचा संपर्क नंबर द्यावा...

कृति आणि एअर इंडियामध्ये वाद व्हायची ही पहिली वेळ नाहीये. 2014 मध्ये तिने एअर इंडियाच्या स्टाफवर आरोप लावला होता की, तिच्यासोबत ते अतिशय वाईट पद्धतीने वागले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kriti Kharbanda slams an Indian airline for losing her luggage yet again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app