बॉलिवूडला आणखी एक धक्का, कतरिना कैफला कोरोनाची लागण, घरीच घेते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:00 PM2021-04-06T18:00:15+5:302021-04-06T18:03:16+5:30

Katrina Kaif Tested Postive: कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

Katrina Kaif tests positive for Covid-19, under home quarantine | बॉलिवूडला आणखी एक धक्का, कतरिना कैफला कोरोनाची लागण, घरीच घेते उपचार

बॉलिवूडला आणखी एक धक्का, कतरिना कैफला कोरोनाची लागण, घरीच घेते उपचार

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफ हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

 

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती होम क्वॉरंटाईन झाली आहे.  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाइन आहे आणि कोरोना संदर्भातील सर्व  नियमांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन तिने केले आहे. चाहत्यांना स्वतःची काळजी घ्या, असेही ती म्हणाली आहे.


कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.


यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.

Web Title: Katrina Kaif tests positive for Covid-19, under home quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.