ठळक मुद्देदीपिकाने कतरिनाचा भांडी घासतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, मला सांगायला दुःख होत आहे की सिझन १ चा पाचवा भाग रद्द झाला असून याचे कारण कतरिना आहे. कारण कतरिनाने माझी ही आयडिया चोरली आहे.

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. सध्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू नाहीये. तसेच सगळे जीमदेखील बंद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. 

सध्या सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. ते घरात राहून काय करत आहेत हे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगत आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण तर रोजच काही ना काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आता तिने सोशल मीडियाद्वारे कतरिना कैफवर चक्क चोरीचा आरोप लावला आहे. कतरिनाने माझी आयडिया चोरली असे दीपिकाचे म्हणणे आहे.

कतरिनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत कतरिना चक्क घरची भांडी घासताना दिसत होती. कतरिना भांडी कशाप्रकारे घासायची याचे लोकांना धडे देताना देखील दिसली होती. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत तिने सांगितले होते की, सगळेजण आता आपापल्या घरी असून घरकाम करायला कोणीच नाहीये. म्हणून मी आणि माझी बहीण इजाबेलने घरातील भांडी स्वतःच घासायची ठरवली.

आता दीपिकाने कतरिनाचा भांडी घासतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, मला सांगायला दुःख होत आहे की सिझन १ चा पाचवा भाग रद्द झाला असून याचे कारण कतरिना आहे. कारण कतरिनाने माझी ही आयडिया चोरली आहे. 

Web Title: "Katrina Kaif Stole My Idea": Deepika Padukone's Reason For Not Sharing New Post PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.