Katrina Kaif to star alongside southern star Vijay Sethupati | कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याचदा चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी विकी कौशल सोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे. मात्र आता ती चर्चेत आली आहे कारण तिला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. कतरिना कैफ साउथचा स्टार विजय सेतुपतीसोबत ती स्क्रीन शेअर करणार असल्याचे समजते आहे. 

साउथचा स्टार विजय सेतुपतीची साऊथमध्ये खूप फॅन फॉलोइंग आहे आणि आता जेव्हा विजय आणि कतरिना एकत्र चित्रपटामध्ये दिसणार म्हटल्यावर डबल धमाका होणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार श्रीराम राघवनच्या चित्रपटात विजय आणि कतरिना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विजय सुपरहिट तमीळ चित्रपट मानागरमच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार आहे. संतोष सिवन दिग्दर्शित या चित्रपटात विजय कॉमेडी करताना दिसणार आहे.

कतरिना कैफच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर लवकरच ती सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. सूर्यवंशी हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. २०२१ मध्ये सूर्यवंशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय कतरिना सध्या भूत पोलिस चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत.


विकी काैशल आणि कतरिना कैफचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्ये एकत्र असतात एवढेच नव्हे तर या दोघांनी एकत्र नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कतरिनाने तिच्या बहिणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण त्या फोटोमध्ये बहिणीच्या मागे असलेल्या आरशात विकी कौशल दिसत होता. कतरिनाला जेव्हा हे समजले तेव्हा तिने तो फोटो डिलीट केला मात्र, तोपर्यंत तो फोटो व्हायरल झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Katrina Kaif to star alongside southern star Vijay Sethupati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.