Katrina kaif is hugging rumoured boyfriend vicky kaushal in her latest selfie photo viral | बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या अफेअरला घेऊन बॉलिवूड गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोेघे एकमेकांना डेट करत आहे. मात्र दोघांनीही अजूनपर्यंत आपल्या नात्याला स्वीकारलं नाही. दोघांनी या प्रकरणी अद्याप मौन बाळगले आहे. अनेकवेळा कॅट आणि विकी एकत्र स्पॉट होतात. न्यू इअरच्या निमित्ताने कतरिना कैफने एक फोटो शेअर केला होता. ज्यात  विकी कौशलचे प्रतिबिंब आरशात दिसले होते आणि आता पुन्हा एकदा तिने असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फुलपाखरे सगळीकडे दिसतायेत. या फोटोमध्ये कतरिनासोबत आणखी कुणी तरी आहे. मात्र या व्यक्तीचा चेहरा फोटोत दिसत नाही आहे. मात्र या फोटोत कतरिना कैफ विक्की कौशलला मिठी मारत असल्याचे अभिनेत्रीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे पुरावेही दिले आहेत.

 कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोत मस्टर्ड रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीला मिठी मारताना दिसते आहे. त्याचवेळी विक्की कौशलने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने मस्टर्ड रंगाची टी-शर्टमध्ये दिसतो आहे. यावरुन चाहत्यांनी अंदाज लावला आहे की फोटोत कतरिनासोबत असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून विकी कौशलच आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Katrina kaif is hugging rumoured boyfriend vicky kaushal in her latest selfie photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.