ठळक मुद्देअक्षयबद्दलचा करिश्माचा राग काळानुरूप निवळला असावा. पण म्हणून अक्षयची पक्की मैत्रिण ती कधीच बनू शकली नाही.

अक्षय कुमारने अनेक सिनेमांत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यापैकीच एक होती करिश्मा कपूर. अक्षय व करिश्माने काही सिनेमात एकत्र काम केले. पण एकवेळ अशी आली की, करिश्मा अक्षयचा द्वेष करू लागली होती. अक्षयचा चेहरा पाहिला तरी तिची तळपायाची आग मस्तकात जायची.
होय, अक्षय व करिश्माचा पहिला सिनेमा ‘दीदार’च्या सेटवरच करिश्माच्या मनात अक्षयबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. करिश्मा कपूर घराण्याची लेक होती. याऊलट अक्षय अगदी डाऊन टू अर्थ असा अभिनेता होता. बॉलिवूडमध्ये त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता. अशात दोघांच्याही बॅकग्राऊंडमध्ये बरेच अंतर होते.

करिश्मा सेटवर आली की, वेगळ्याच तो-यात असायची. साहजिकच सेटवरचे अनेक लोक तिच्यापासून दूर राहणे पसंत करायचे. याऊलट अक्षय डाऊन टू अर्थ असल्याने अगदी स्पॉटबॉयपासून तर डायरेक्टरपर्यंत सगळेच त्याच्या प्रेमात होते. दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्तीचा तर तो चांगला मित्र बनला होता. लोक आपल्याला नाही तर अक्षयला भाव देतात, हीच गोष्ट कदाचित करिश्माला खटकत असावी. एकदा तिची सटकली आणि अक्षयवर बरसली. तू डायरेक्टरचा चमचा आहेस, असेही तिने अक्षयला सुनावले. तेव्हापासून अक्षय दिसला तरी तिचा तडफडाट व्हायचा.

त्याकाळात कोणताही मोठा सिनेमा हाती नसल्याने अगदी मनाविरूद्ध करिश्माने अक्षयसोबत काही सिनेमे साईन केलेत. एका टप्प्यावर मात्र अक्षयसोबत आणखी काम करायचे नाही, हे तिने ठरवून टाकले.  करिश्माला   ‘संघर्ष’ हा सिनेमा आॅफर झाला. करिश्माला खरे तर सिनेमाची स्क्रिप्ट आवडली होती. पण यात अक्षय तिच्या अपोझिट असणार हे कळताच तिने या सिनेमाला नकार कळवला. ‘हेराफेरी’ या सिनेमाबद्दलही असेच झाले.

‘दिल तो पागल है’ हा सिनेमा करिश्माने साईन केला होता. या सिनेमात अक्षयचाही छोटासा रोल होता. मात्र अक्षयसोबत सीन नसल्याने करिश्माने हा सिनेमा केला.

अक्षयबद्दलचा करिश्माचा राग काळानुरूप निवळला असावा. पण म्हणून अक्षयची पक्की मैत्रिण ती कधीच बनू शकली नाही. याऊलट तिची बहीण करिना कपूर मात्र अक्षयची क्लोज फे्रन्ड आहे. अक्षय व करिनाने अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karisma Kapoor hate akshay kumar for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.