करीना कपूरच्या को-स्टारची पत्नी आहे इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:45 PM2019-11-23T13:45:29+5:302019-11-23T13:46:51+5:30

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला एकताचे ग्लॅमरस फोटोंनी लक्ष नाही वेधले तरच नवल.

Kareena Kapoor's co-star's Sumeet Vyas wife is so beautiful, See Pics | करीना कपूरच्या को-स्टारची पत्नी आहे इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा !

करीना कपूरच्या को-स्टारची पत्नी आहे इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा !

googlenewsNext

'वीरे दी वेडिंग' सिनेमात करीना कपूरच्या प्रियकराची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित व्यासने  गेल्याच वर्षी दुसरे लग्न केले होते. अभिनेत्री एकता कोलसोबत तो लग्नबंधनात अडकला होता. सुमित 34 वर्षांचा तर त्याची होणारी दुसरी पत्नी ही 27 वर्षांची आहे. दोघांमध्ये 7 वर्षांचे अंतर आहे. सुमितचे पहिले लग्न अभिनेत्री शिवानी टंकसलेसोबत झाले होते. पण 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. सुमित व्यास पुन्हा एकदा चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे. त्याच्या पत्नीचे हे ग्लॅमरस फोटो. 


सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला एकताचे ग्लॅमरस फोटोंनी लक्ष नाही वेधले तरच नवल. एकतादेखील टीव्ही अभिनेत्री आहे. एकताने  'रब से सोना इश्क 'बडे अच्छे लगते हैं'  'ये है आशिकी' 'एक रिश्ता ऐसा भी' 'मेरे अंगने में'  या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर सुमित व्यास आणि एकताचे फोटोंना अधिक पसंती मिळते आहे. या दोघांचा रोमँटीक अंदाजातील फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


विशेष म्हणजे दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे.  गेल्या काही महिन्यांत एकता सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.  एकता सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. आपल्या पतीसह आकर्षक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  तिचे  फोटो पाहून तुम्हीही एकताच्या सौंदर्यावर फिदा व्हाल. तिचे घायाळ करणारे सौंदर्य कमाल आहे असे शब्द तुमच्या ओठावर आपसुकच येतील.

Web Title: Kareena Kapoor's co-star's Sumeet Vyas wife is so beautiful, See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.