Kareena kapoor told how Saif Ali Khan reacted on hearing second pregnancy news | करिनाने सांगितलं, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सीची बातमी ऐकल्यावर काय होती सैफची रिअ‍ॅक्शन!

करिनाने सांगितलं, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सीची बातमी ऐकल्यावर काय होती सैफची रिअ‍ॅक्शन!

२०२० सालाची सुरूवात भलेही चांगली नव्हती. पण काही गुडन्यूजही समोर आल्या आहेत. अनुष्का शर्मा आणि करिना कपूर आई होणार आहेत. अनुष्काची ही पहिलीच वेळ आहे तर करिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. करिनाने ऑगस्ट २०२० मध्ये गुडन्यूज दिली होती की, ती आणि सैफ पुन्हा आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या फॅन्समध्ये या बातमीने आनंदाचं वातावरण आहे. आता करिना सांगितलं की, जेव्हा सैफला ही गुडन्यूज दिली तेव्हा सैफची प्रतिक्रिया काय होती.

'फिल्मी नव्हती प्रतिक्रिया'

सामान्यपणे आपण सिनेमात बघतो की, अशाप्रकारची गुडन्यूज सांगितल्यावर हिरो कशाप्रकारे नाचायला लागतात. पण करिनाने झूमसोबत बोलताना नुकतेच सांगितले होते की, जेव्हा सैफला याबाबत कळालं तेव्हा त्याची प्रतिक्रिया फिल्मी अजिबात नव्हती. तो शांत आणि आनंदी होता. जसे की, मी सांगितले आम्ही हा प्लॅन केला नव्हता. पण आम्हाला हे हवं होतं आणि आम्हाला हे एन्जॉय करायचं होतं. आता आम्ही पूर्णपणे एन्जॉय करत आहोत. (बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल)

तैमूरवेळी जाहिरातीत तर आता सिनेमात बिझी

सैफ आणि करिनाने आपल्या फॅन्सना ही गुडन्यूज देण्यासाठी स्टेटमेंट जारी केलं होतं. करिनाने यावेळी हेही सांगितलं की, तैमूरवेळी ती शेवटपर्यंत कामात अ‍ॅक्टिव होती. त्यावेळी ती जाहिराती शूट करत होती. यावेळी ती सिनेमाचं शूटींग करत आहे. करिना कपूर आमीर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २०२१ मध्ये रिलीज होईल. (करिना व सैफचे दुसरे बाळ असेल ‘कोरोनियल ’; काय होतो याचा अर्थ?)

फोटो झालेत व्हायरल

दरम्यान, करिना कपूर खान गुरुवारी (काल) रात्री मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. करिनाने यावेळी वनपीस घातला होता त्यावर डेनिम जॅकेट घेतले होते. या ड्रेसमध्ये करिना कपूरचे बेबी बॅम्प स्पष्ट दिसत होते. करिना कपूरच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो आला आहे. सोशल मीडियावर करिनाचे हे फोटो वेगाने व्हायरल होतायेत. करिनासोबत यावेळी सैफ अली खानदेखील होता.

अलीकडेच करिनान 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली आहे. जवळपास एक महिना सैफ, करिना आणि तैमूर दिल्लीतील पतौडी पॅलेसमध्ये थांबले होते. शूटिंग पूर्ण झाल्यावर करिनाने एका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ''मी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. कठीण काळ होता मी प्रेग्नेंन्सी, भीती, मात्र यासगळ्या गोष्टी माझ्या ध्येयाला थांबवू शकल्या नाहीत. मी शूटिंग पूर्ण केले. सर्व काळजी घेत. आमिर खान आणि अव्दैत चंदन यांचे आभार. धन्यवाद टीम.'' असे या पोस्टमध्ये करिनाने लिहिले होते.  
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena kapoor told how Saif Ali Khan reacted on hearing second pregnancy news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.