Kareena Kapoor shares picture of son Taimur Ali Khan with his cousin sister Inaaya Naumi Khemmu | तैमूरने बहीण इनायासोबत दिली अशी काही क्यूट पोज, फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू!

तैमूरने बहीण इनायासोबत दिली अशी काही क्यूट पोज, फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरसोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते आणि सतत तिच्या कामाचे, शूटींगचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत राहते. आता तिने मुलगा तैमूर अली खान आणि सोहा अली खानची मुलगी इनाया नाओमी खेमूचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

करिना कपूरने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तैमूर आणि त्याची आते बहीण इनाया दिसत आहे. दोघांनीही फारच क्यूट अंदाजात पोज दिली आहे. फोटो इतका भारी आहे की, तुम्हीही बघतच रहाल. सोबतच करिनाने या पोस्टवर लिहिलं आहे'ब्रदर्स एंड सिस्टर्स फॉरएवर'.

दरम्यान करिना कपूर नुकतीच पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अली खानसोबत हिमाचल प्रदेशात जाऊन आली. ती धर्मशाला आणि पालमपूरमध्ये फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम घालवत होती. सैफ अली खानने त्याच्या आगामी 'भूत पोलिस' सिनेमाचं शूटींग नुकतंच पूर्ण केलं. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर करिना कपूरने तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा'चं शूटींग ऑक्टोबरमध्येच पूर्ण केलं. या सिनेमात ती आमीर खानसोबत दिसेल. तसेच करिना कपूर आगामी मल्टीस्टारर तख्त सिनेमातही दिसणार आहे. सध्या ती तिची दुसरी प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor shares picture of son Taimur Ali Khan with his cousin sister Inaaya Naumi Khemmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.