गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड चांगलाच रुळू झाला आहे. एकामागोमाग एक अनेक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचं. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निर्माता करण जोहर हा सिनेमा तयार करणार आहे. यात सौरव गांगुलीची भूमिका ह्रतिक रोशन साकारणार आहे.    


रिपोर्टनुसार सौरव गांगुली निर्माता करण जोहरसोबत त्याच्या बायोपिकसाठी हात मिळवू शकतो. काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीने खुलासा केला होता की त्याच्या बायोपिकमध्ये ह्रतिक रोशनने मुख्य भूमिका साकारावी अशी त्याची इच्छा आहे. रिपोर्टनुसार यासंदर्भात सौरव गांगुली आणि करण जोहरची भेटदेखील झाली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.   


सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ऋतिक ने 2019 मध्ये दोन बॅक टू बॅक हिट दिले होते आणि वॉर सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे. २०१९ मध्ये आपल्या दमदार अभिनय आणि परफॉर्मेंससोबत ऋतिकचा बोलबाला बघायला मिळाला होता ज्यात 300 करोड़ क्लबमध्ये प्रवेश करत त्याने सर्व रेकॉर्ड तोडले होते. 

 

Web Title: karan johar to make sourav ganguly biopic hrithik roshan may play lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.