वाद संपला! करण जोहरने सोशल मीडियावर मागितली मधुर भांडारकरची माफी, जाणून घ्या काय झाला होता दोघांमध्ये वाद...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 10:57 AM2020-11-27T10:57:50+5:302020-11-27T11:02:39+5:30

करण जोहरचा नवा शो 'द फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' काही दिवसात रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच या शोवर वादाचं ग्रहण लागलं. 

Karan Johar apologize to Madhur Bhandarkar the fabulous lives of bollywood | वाद संपला! करण जोहरने सोशल मीडियावर मागितली मधुर भांडारकरची माफी, जाणून घ्या काय झाला होता दोघांमध्ये वाद...

वाद संपला! करण जोहरने सोशल मीडियावर मागितली मधुर भांडारकरची माफी, जाणून घ्या काय झाला होता दोघांमध्ये वाद...

Next

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या दोन मोठ्या फिल्ममेकरमध्ये वाद सुरू होता. दिग्दर्शक मधुर भांडारकरने करण जोहरवर त्याच्या एका सिनेमाचं टायटल चोरल्याचा आरोप लावला होता. करण जोहरचा नवा शो 'द फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' काही दिवसात रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच या शोवर वादाचं ग्रहण लागलं. 

मधुर भांडारकरने ट्विट करत करण जोहरवर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, करण जोहर आणि अपूर्वा मेहताने मला विचारलं होतं की, ते त्यांच्या सीरीजचं नाव बॉलिवूड वाइफ्स ठेवू शकतात का? यावर मी नकार दिला होता. कारण माझा असाच एक प्रोजेक्ट याच नावाने रिलीज होणार होता.

त्यानंतर मधुर भांडारकरने अनेकदा सोशल मीडियावरून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पण करणकडून यावर काहीच उत्तर आलं नव्हतं. पण आता करण जोहरने याबाबतचं मौन सोडलं आहे आणि यावर प्रतिक्रिया दिली आहे.
करण जोहरने केवळ या प्रतिक्रियाच दिली नाही तर मधुर भांडारकरची माफीही मागितली आहे. त्याने एका लांबलचक पोस्टच्या माध्यमातून मधुरला स्पष्ट सांगितलं आहे की, तुला मला अजिबात त्रास द्यायचा नव्हता.

करणने लिहिले की, मला माहीत आहे की, काही दिवसांपासून तू परेशान आहे. पण मला हे तुला सांगायचं आहे की, आमच्या नव्या सीरीजचं नाव फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स ठेवण्यात आलं आहे. हे पूर्णपणे वेगळं टायटल होतं. मला अजिबात अंदाज नव्हता की, तुला वाईट वाटेल.

करणने पुढे लिहिले की, मला तुला विश्वास द्यायचा आहे की, आमच्या सीरीजचा फॉरमॅट, कथा आणि टायटल सगळं काही वेगळं आहे. याने तुमचं काम प्रभावित होणार नाही. मला आशा आहे की, आपण या वादातून पुढे जाऊ.

तेच मधुर भांडारकरने करणची माफी मान्य केली आहे. पण त्याने ट्विटरवर याचं दु:खं व्यक्त केलं की, काही नियमांचं पालन केलं गेलं नव्हतं. त्याला अजूनही याचा राग आहे की, त्याच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं.
 

Web Title: Karan Johar apologize to Madhur Bhandarkar the fabulous lives of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app