कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 15:03 IST2020-08-30T15:02:19+5:302020-08-30T15:03:20+5:30
सर्वांशी ‘पंगा’ घेणा-या कंगनाच्या आईला सतावतेय ही चिंता

कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली...
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौतच्या ताज्या मुलाखतीने सगळीकडे खळबळ माजली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर कंगनाने काल-परवा एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये पाण्यासारखे ड्रग्ज सर्व्ह केले जाते, असे काय काय खुलासे कंगनाने केले होते. कंगनाची ही मुलाखत सध्या चर्चेत आहे. पण कंगनाची आई मात्र तिच्या या मुलाखतीमुळे घाबरली आहे. सर्वांशी पंगे घेणाºया आपल्या लेकीचे लग्न कसे होणार? अशी चिंता तिला सतावू लागली आहे. तिला खुद्द कंगनाने एक पोस्ट लिहून ही माहिती दिली.
कंगनाची पोस्ट...
कल रात माता जी को उत्सुकता से फ़ोन करके पूछा कैसा लगा इंटर्व्यू,तो वो रो पड़ी, कहने लगी मैं तुम्हारी शादी केलिए उपवास करती हूँ तुम दुनिया भर में अपने साथ हुए गंदे हादसों को बताती ही रहती हो।अब फ़ोन पे फ़ोन आ रहे हैं लगता है उनका रोने का नहीं रुलाने का इरादा है, क्या किया जाए? 🙂 pic.twitter.com/3490VY6DHW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2020
कंगनाने लिहिले, ‘काल रात्री आईला उत्सुकतेने फोन केला. कशी वाटली माझी मुलाखत, असे मी तिला विचारले. यावर ती ढसाढसा रडू लागली. मी तुझ्या लग्नासाठी उपवास करते आणि तू अख्ख्या जगाला तुझ्यासोबत झालेल्या वाईट गोष्टी सांगत फिरते, असे ती रडत रडत मला म्हणाली. आता तिचे फोन वर फोन येत आहेत. कदाचित आता रडण्याचा नाही तर रडवण्याचा तिचा इरादा आहे. काय करू?’
नुकतीच केली होती महामृत्यंजय पूजा
कंगनाच्या आईला लेकीची चिंता सतावते आहे आणि ही चिंता उगाच नाही. आत्तापर्यंत कंगनाने बॉलिवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीती खुद्द कंगनाने अनेकदा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या मनाली येथील घराबाहेर बंदुकीच्या गोळ्या चालल्याचा आवाज ऐकू आला होता. यानंतर कंगनाने पोलिस सुरक्षेचीही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अलीकडे कंगनाच्या आईने तिच्या सुरक्षेसाठी महामृत्यंजय जप पूजा घातली होती. या पूजेचा व्हिडीओही कंगनाने शेअर केला होता.
Kangana Ranaut Exclusive: जब Rhea के इंटरव्यू से बॉलीवुड के 'ड्रग माफिया' तक बिंदास बोलीं 'क्वीन'! - YouTube #KanganaSpeaksToArnabhttps://t.co/u4wJxnG2N1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 29, 2020