kangana ranaut tweet says ranbir kapoor serial skirt chaser deepika padukone self proclaimed mental patient | रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

ठळक मुद्देसुशांत प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या सपोर्ट करणारा अभिनेता आयुष्यमान खुराणा सध्या ट्रोल होतोय. कंगनानेही यानिमित्ताने त्याच्यावर टीका केली.

बिनधास्त आणि परखड स्वभावासाठी ओळखजी जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या जाम चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमविरोधात जणू तिने सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. महेश भट, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा अशा सर्वांना लक्ष्य करणाºया कंगनाने आता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणवर तोफ डागली आहे. कंगनाच्या वतीने तिच्या टीमने रणबीर व दीपिकाबद्दल असे काही ट्विट केले की, युजर्सही सुन्न झालेत.

रणबीर व दीपिकावर निशाणा साधत तिने लिहिले, ‘रणबीर कपूर एक सीरिअल स्कर्ट चेजर व्यक्ती आहे. पण त्याला रेपिस्ट म्हणण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. दीपिका पादुकोण ही स्वयंघोषित मानसिक रूग्ण आहे. पण तिला कोणीही ‘सायको’ म्हणत नाही. ही विशेषणं कदाचित सामान्य कुटुंबातून, लहान शहरांमधून आलेल्या आऊटसाइडर्ससाठी राखीव आहेत.’
 कंगनाचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होतेय. सोशल मीडिया युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कंगनाने केवळ बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दाच उचलून धरलेला नाही तर बॉलिवूडमध्ये आऊटसाईडर असूनही या मुद्यावर गप्प बसणाºया कलाकारांवरही टीका केली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्करला लक्ष्य केले होते.

आयुष्यमानवरही टीका
सुशांत प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या सपोर्ट करणारा अभिनेता आयुष्यमान खुराणा सध्या ट्रोल होतोय. कंगनानेही यानिमित्ताने त्याच्यावर टीका केली.‘चापलूस आउटसाइडर्स केवळ एका कारणाने माफियांना सपोर्ट करतात. ते म्हणजे त्यांच्या विचारातील सामान्यता. त्यांना इंडस्ट्रीतून कुणी धमकावत नाही. कंगना आणि सुशांतसारख्या लोकांची ते खिल्ली उडवतात  आणि खरे काही सांगत नाहीत’, अशा शब्दांत तिने आयुष्यमानला सुनावले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut tweet says ranbir kapoor serial skirt chaser deepika padukone self proclaimed mental patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.