kangana ranaut target deepika padukone for latest levis jeans advertisement | फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!!

फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!!

ठळक मुद्देतुम्हाला ठाऊक असेलच की, दीपिकाने एका जीन्स ब्रँडची जाहिरात केली आहे. या जाहिरातीवर चोरीचा आरोप होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने आता कोणावर निशाणा साधला आहे तर दीपिका पादुकोणवर. होय, तसा कंगना व दीपिकाचा वाद बराच जुना आहे. त्यामुळे कंगना सतत या ना त्या कारणाने दीपिकाला लक्ष्य करत असते. आता पुन्हा एकदा कंगना दीपिकावर बिथरली आहे. कारण काय तर एका जीन्सची जाहिरात.
दीपिकाने नुकतीच एका अमेरिकन जीन्स ब्रँडची जाहिरात केली. ही जाहिरात सध्या वादात सापडली आहे. नेमक्या याच जाहिरातीवरून कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला लक्ष्य केले आहे.

कंगनाने एक फोटो शेअर केला आहे.  1885 सालच्या या फोटोत भारत, जपान व सीरियाच्या पहिल्या परवानाधारक महिला डॉक्टर्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फोटो ट्विट करत कंगनाने लिहिले, ‘जुन्या महिलांच्या सन्मानार्थ ट्विट. या महिलांनी केवळ आपले व्यक्तिमत्त्व सिद्ध केले नाही तर  सभ्यता, संस्कृती व देशासाठी काम केले. आज अशा लोकांचे फोटो काढायचे झाल्यास त्या फाटकी अमेरिकन जिन्स  व चिंधी झालेले ब्लाऊज घालून केवळ अमेरिकन मार्केटींगचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.’
आपल्या या ट्विटमधून कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला टोला लगावला आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, दीपिकाने एका जीन्स ब्रँडची जाहिरात केली आहे. या जाहिरातीवर चोरीचा आरोप होत आहे. ही जाहिरात दिग्दर्शक सूनी तारापुरवालाच्या ‘Yeh Ballet’ या सिनेमातून कॉपी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. सूनी यांच्या आरोपानंतर जाहिरातीचे प्रॉडक्शन डिझाइनर रूपिन सूचक यांनी काही प्रमाणात ही जाहिरात ‘Yeh Ballet’पासून प्रेरणा घेत बनवल्याचे मान्य केले आहे. ‘Yeh Ballet’ हा सिनेमा गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. सिद्धार्थ रॉय कपूरने हा सिनेमा प्रोड्यूस केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut target deepika padukone for latest levis jeans advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.