या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:14 PM2020-07-21T15:14:06+5:302020-07-21T15:14:51+5:30

कालपरवा एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला.

kangana ranaut slams anurag kashyap calls him mini mahesh bhatt |  या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’

 या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’

googlenewsNext
ठळक मुद्देअनुरागचे ट्वीट पाहून कंगना भडकली नसेल तर नवल. मग काय, कंगनाच्या वतीने तिची टीम जणू पेटून उठली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दोन व्यक्ति जाम चर्चेत आहेत. एक म्हणजे करण जोहर आणि दुसरी म्हणजे कंगना राणौत. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने नेपोटिजमचा मुद्दा उचलून धरला आणि तिच्या आरोपांनी बॉलिवूडमधील वातावरण तापले. कालपरवा एका मुलाखतीत तिने पुन्हा बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात  दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला.  पण कंगनाने त्यालाही ‘मिनी महेश भट’ म्हणत शिंगावर घेतले.  

काय म्हणाला अनुराग कश्यप..

कंगनाची मुलाखत बघितल्यावर अनुरागने पहिले ट्वीट केले होते. ‘काल कंगनाची मुलाखत बिघतली. एकेकाळी माझी चांगली मैत्रिण होती. माझ्या प्रत्येक सिनेमानंतर मला हिंमत द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. आत्ता तिचा हा भयावह इंटरव्ह्यू सुद्धा बघितला. जो मणिकर्णिका रिलीज झाल्यानंतरचा आहे,’ असे या ट्वीटमध्ये त्याने लिहिले. यानंतर त्याने कंगनावर आणखी बरेच ट्वीट केलेत.

‘इनसाईडर असो वा आऊटसाईडर यशाची आणि पैशांची हवा सगळ्यांच्या सारखीच डोक्यात जाते. माझ्यासारखे बना, माझ्याकडून शिका हे मी कंगनाच्या तोंडून कधीच ऐकले नाही. माझ्यासोबत जे नाहीत ते सगळे चमचे, मतलबी आहेत, एवढेच तिच्या तोंडून निघते,’ असे एका ट्वीटमध्ये तो म्हणाला. ‘जी आपल्या सर्व दिग्दर्शकांना शिव्या देते, एडिटमध्ये बसून आपल्या सहकलाकारांचे रोल कापते. आज जुने दिग्दर्शक तिच्यासोबत काम करताना दूर पळतात. दुस-यांना दाबण्याची हीच ताकद कंगनाने कमावलीय,’असेही एका ट्वीटमध्ये त्याने लिहिले.
‘मी बोलणार. आता खूप झाले. तुझ्या घरच्यांना दिसत नसेल, तुझ्या मित्रांना दिसत नसेलही पण एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे सगळे तुझा वापर करत आहेत. तुझे आज कोणी नाही. बाकी तुझी मर्जी. मला जितक्या शिव्या घालायच्या घाल,’ असे अन्य एका ट्वीटमध्ये त्याने म्हटले.  

काय म्हणाली कंगना?

अनुरागचे हे ट्वीट पाहून कंगना भडकली नसेल तर नवल. मग काय, कंगनाच्या वतीने तिची टीम जणू पेटून उठली. ‘हा बघा मिनी महेश भट. जो कंगनाला एकटी व खोट्या लोकांनी वेढलेली असल्याचे म्हणतोय. हे लोक कंगनाचा वापर करत आहेत. अ‍ॅन्टी नॅशनल्स, अर्बन नक्शल्स जे अतिरेक्यांना वाचवतात. आता ते मुव्ही माफियांना पाठीशी घालत आहे,’ असे ट्वीट कंगनाच्या टीमने केले.  

 
   

Web Title: kangana ranaut slams anurag kashyap calls him mini mahesh bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.