kangana ranaut sister rangoli chandel slams maharashtra cm uddhav thackeray-ram | Corona Virus : म्हणे, योगींकडून शिका...! कंगना राणौतची बहीण रंगोलीची उद्धव ठाकरेंवर टीका

Corona Virus : म्हणे, योगींकडून शिका...! कंगना राणौतची बहीण रंगोलीची उद्धव ठाकरेंवर टीका

ठळक मुद्देकाहींनी केले ट्रोल, काहींनी घेतली बाजू

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. ट्विटरवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली रंगोली तिच्या ट्विटद्वारे अनेकदा वाद ओढवून घेते. अनेकदा ट्रोल होते. पण कुणाला जुमानेल ती रंगोली कसली. आता रंगोलीने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. काही तासांपूर्वी रंगोलीने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगीजींकडून गंभीर धडा देण्याची गरज आहे,’ असे ट्विट रंगोलीने केले आणि तिचे हे ट्विट बघता बघता क्षणात व्हायरल झाले.
हे ट्विट करताना तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कार्यांचा पाढाही वाचला. होय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये 10000 खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील 10000 खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत, अशी योगींच्या कार्याची महती सांगणारी एका वेब पोर्टलची बातमी या ट्विटसोबत तिने जोडली आणि याच निमित्ताने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

रंगोली ही कंगनाची मॅनेजर आहे. कंगनाचे सगळे काम रंगोली सांभाळते. एकीकडे कंगना तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते तर रंगोली तिच्या ट्विटमुळे़ आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेकांना रंगोलीने लक्ष्य केले आहे. अलीकडे रंगोलीने अभिनेत्री तापसी पन्नूला फैलावर घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजात 9 मिनिटांसाठी दिवे, मेणबत्ती व टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर तापसीने केलेल्या ट्विटला उत्तर देताना रंगोलीने तिला बी-ग्रेड अभिनेत्री म्हटले होते. मोदींना लक्ष्य करणा-या दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावरही ती बरसली होती.

काहींनी केले ट्रोल, काहींनी घेतली बाजू
रंगोलीने उद्धव ठाकरेंवर टीका करत योगी आदित्यनाथ यांची बाजू घेणे अनेक नेटक-यांना खटकले. मग काय रंगोली चांगलीच ट्रोल झाली. एका युजरने तर यानंतर थेट रंगोलीविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

 इतक्या गंभीर स्थितीत राजकारण करणा-या रंगोलीविरोधात कडक कारवाई करावी, असे या युजरने लिहिले. अर्थात अनेकांनी रंगोलीच्या ट्विटचे समर्थनही केले.

Web Title: kangana ranaut sister rangoli chandel slams maharashtra cm uddhav thackeray-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.