kamaal r khan calls malaal debutantes meezaan jaaferi a duffer actor here is what jaaved jaaferi tweeted | बॉलिवूडच्या या ‘खान’वर इतका का संतापला जावेद जाफरी?

बॉलिवूडच्या या ‘खान’वर इतका का संतापला जावेद जाफरी?

ठळक मुद्दे मराठमोळा दिग्दर्शक मंगेश हाडवळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मंगेशने याआधी नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘देख सर्कस देख’ दिग्दर्शित केला होता.

बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी लवकरच ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मिजानला लॉन्च करणार आहेत. भन्साळींची भाची शर्मिन सेहगल ही सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ‘मलाल’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला ब-यापैकी रिस्पॉन्स दिला. पण बॉलिवूडचा एक ‘खान’ मात्र हा ट्रेलर पाहून नेहमीप्रमाणे बरळला. मिजान व शर्मिन दोघांनाही  ‘हॉरीबल, डफर अ‍ॅक्टर्स’ ठरवत त्याने असे काही ट्वीट  केले की, जावेद जाफरी भडकला.
आता बॉलिवूडचा हा ‘खान’ कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे कमाल आर खान अर्थात केआरके. केआरके कायम त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतो. त्याने मिजान आणि शर्मिनबद्दल असेच एक ट्वीट  केले.

‘फिल्म मेकर्स नेपोटिज्ममुळे अशा नॉन टॅलेंटेड आणि हॉरिबल दिसणा-या कलाकारांना लॉन्च करणार असतील तर हा गुन्हा आहे. पब्लिक कधीच आपल्या कष्टाची कमाई अशा डफर अ‍ॅक्टर्सला पाहण्यासाठी खर्च करणार नाही. त्यामुळे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूर्ख बनवले जाऊ शकते, असे बॉलिवूडला वाटत असेल तर त्यांनी असा विचार करणे बंद करावे,’ असे केआरकेने लिहिले.
हे ट्वीट  पाहून मिजानचे पापा अर्थात जावेद जाफरी कमालीचा संतापला. त्याने केआरकेला निराश आणि अपयशी अभिनेता म्हणत, त्याला  सडेतोड  उत्तर दिले. ‘हे एका निराश आणि अपयशी अभिनेत्याचे शब्द आहेत. मी काही नेपोटिज्मचा फायदा घेणा-या स्टार्सची नावे देत आहे, जे अनेक वर्षांपासून जनतेला मूर्ख बनवत आहेत. आमिर खान, सलमान खान, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, सनी देओल, सैफ अली खान, ऋषी कपूर, करिश्मा कपूर, करिना कपूर, काजोल, रवीना टंडन...’, असे जावेद जाफरीने लिहिले. 

तो इथेच थांबला नाही तर त्याने कमाल आर खानसाठी आणखी एक ट्वीट  केले. ‘जिथे प्रचंड स्पर्धा आणि पैशांचा प्रश्न आहे, तिथे कुठलाही निर्माता हॉरीबल, डफर कलाकारांवर पैसा लावणार नाही.    इंडस्ट्रीत असलेल्या ओळखीच्या भरवशावर केवळ इंटरव्ह्यूपर्यंत पोहचता येऊ शकते. पण नंतर टॅलेंटच कामात येते. शेवटी प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना दिवसरात्र कष्ट करावे लागतात,’ असेही जावेद जाफरीने सुनावले.

Web Title: kamaal r khan calls malaal debutantes meezaan jaaferi a duffer actor here is what jaaved jaaferi tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.