ठळक मुद्दे'सेक्रेड गेम्स'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे

सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे. कल्कि यात नक्की कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'सेक्रेड गेम्स'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसिरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत होती. नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता तर नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती.  


प्रेक्षकांची लाडकी 'सेक्रेड गेम्स २' वेबसिरिज जून ते ऑगस्टच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे नवाझुद्दीनने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. 


सेक्रेड गेम्स'मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती तर सरताज सिंग या भूमिकेत सैफ अली खान झळकला होता. या दोघांच्या अभिनयाच्या आणि लूकच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या वेबसिरिजच्या पहिल्याच भागात गायतोंडेची हत्या झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याची हत्या का झाली, कशाप्रकारे करण्यात आली, त्याच्या हत्येमागे काय रहस्य होते. यातील काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पहिल्या सिझनमध्ये मिळाली होती आणि आता या सिझनमध्ये यामागची अनेक रहस्य उलगडली जाणार आहेत.

कल्कि बाबत बोलायचे झाले तर ती जोया अख्ततरच्या गल्ली बॉयमध्ये दिसली होती. यात तिच्या वाटेला छोटीशी भूमिका आली होती पण तिने प्रभावीपणे साकारली होती.   

English summary :
Sacred Games Second Season: The audience is excited about the second part of the 'Sacred Games' webseries. This webseries was based on the novel Vikram Chandra's Sacred Games (2006). Kalki koechlin played role in this series,


Web Title: kalki koechlin is likely to join sacred games for the second season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.