कबीर सिंहमधील अभिनेत्रीसोबत भर रस्त्यात घडला विचित्र प्रकार, बसला तिला मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:45 AM2021-11-30T11:45:20+5:302021-11-30T11:45:52+5:30

अभिनेत्री निकिता दत्तानं (Nikita Dutta) सांगितलं की, खुलेआम तिच्या हातून वस्तू हिसकावून घेण्यात आली आणि या घटनेमुळे तिला चांगलाच धक्का बसला.

Kabir Singh actress Nikita Dutta phone was snatched at Bandra | कबीर सिंहमधील अभिनेत्रीसोबत भर रस्त्यात घडला विचित्र प्रकार, बसला तिला मोठा धक्का!

कबीर सिंहमधील अभिनेत्रीसोबत भर रस्त्यात घडला विचित्र प्रकार, बसला तिला मोठा धक्का!

googlenewsNext

'कबीर सिंह' मध्ये आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री निकीता दत्ता (Nikita Dutta) ने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत सांगितलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, खुलेआम तिच्या हातून वस्तू हिसकावून घेण्यात आली आणि या घटनेमुळे तिला चांगलाच धक्का बसला.

निकिताचा वाईट अनुभव

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताने नुकतीच तिच्यासोबत मुंबईच्या रस्त्यावर घडलेल्या वाईट घटनेबाबत सांगितलं. अभिनेत्रीने सांगितलं की, तिचा फोन तिच्या हातातून हिसकावून घेण्यात आला. त्यावेळी ती मुंबईतील वांद्रेच्या रस्त्यावर चालत होती. तिने यावेळी तिच्यासोबत घडलेल्या घटनेवरून लोकांमध्ये जागरूकता वाढण्याचा प्रयत्न केला आणि तिची मदत करणाऱ्यांचे आभार मानले.

फोन घेऊन पळाले चोर

आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर निकिता दत्ताने तिच्या या अनुभवाबाबत सांगितलं. तिने लिहिलं की, 'मला काल एक फारच वाईट अनुभव आला, जो फार  नाटकीय होता आणि २४ तास मला यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. मी सायंकाळी ७.४५ वाजता वांद्रेतील १४व्या लेनवर चालत होते. दोन लोक बाईकवरून आले आणि त्यांनी माझ्या डोक्याला हात लावला, ज्यामुळे अचानक मला काय झालं ते समजलंच नाही. बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीने माझ्या हातातून माझा फोन हिसकावला. मी काही करायच्या ते पळून गेले'.

बिग बुल स्टारने पुढे सांगितलं की, या घटनेमुळे तिला चांगलाच धक्का बसला आहे. काही वेळ तर काहीच सुचलं नाही. स्नॅचर्स पळून गेले होते. निकितानेही हेही सांगितलं की, रस्त्याने जात असलेल्या काही लोकांनी मदत केली. काही लोक त्या स्नॅचर्सच्या मागेही धावत होते. पण ते पळून गेले. निकिताने पुढे सांगितलं की, 'या घटनेमुळे मला फारच राग आला होता. मला भीतीही वाटली'. 
 

Web Title: Kabir Singh actress Nikita Dutta phone was snatched at Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.