"शाहरुखसोबत मॅच पाहू शकत नाही", असं का म्हणाली KKR ची मालकीण जुही चावला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:07 IST2024-04-04T10:06:25+5:302024-04-04T10:07:04+5:30

पडद्यावरची लाडकी जोडी प्रत्यक्षात एकत्र मॅचही पाहू शकत नाही?

Juhi Chawla says she cant watch IPL KKR match with Shahrukh Khan know the reason | "शाहरुखसोबत मॅच पाहू शकत नाही", असं का म्हणाली KKR ची मालकीण जुही चावला?

"शाहरुखसोबत मॅच पाहू शकत नाही", असं का म्हणाली KKR ची मालकीण जुही चावला?

बॉलिवूडमधील 90s ची हिट जोडी म्हणजे शाहरुख-जुहीची (Shahrukh Khan-Juhi Chawla) जोडी. दोघांनी 'येस बॉस', 'राम जाने', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. शाहरुख-काजोलप्रमाणेच शाहरुख-जुही ही जोडीही प्रेक्षकांची लाडकी होती. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं आयपीएलमध्ये KKR टीमचे मालकही आहेत. पण 'को ओनर' नात्याने त्यांच्यातला बाँड फारसा चांगला नाही असं स्वत: जुहीच म्हणाली. काय आहे नेमकं कारण?

सध्या सगळीकडे आयपीएल IPL ची धूम आहे. शाहरुख आणि जुही कोलकता नाईट राइडर्सचे मालक आहेत. पण शाहरुखसोबत स्टेडियममध्ये बसून मी मॅच बघू शकत नाही असं ती म्हणाली. IANS ला दिलेल्या मुलाखतीत जुही म्हणाली, "आयपीएलमध्ये नेहमीच मजा येते. आपण सगळेच टीव्हीसमोर बसलेलो असतो. जेव्हा आमचा संघ खेळतो तेव्हा मॅच पाहायला अजूनच उत्साह येतो. पण आम्ही सगळे तणावातही असतो."

ती पुढे म्हणाली, "शाहरुखसोबत KKR ची मॅच पाहणं ही अजिबातच चांगली आयडिया नाही. कारण जेव्हा टीम वाईट परफॉर्म करत असते तेव्हा शाहरुख सगळा राग माझ्यावर काढतो. तो मला खूप ओरडत असतो. तेव्हा मी त्याला सांगते की ही गोष्ट मला नाही टीमला सांगायला हवी. त्यामुळे आम्ही एकत्र मॅच पाहू शकत नाही."

शाहरुख खान आणि जुही आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून KKR टीमचे मालक आहेत. दोघांना अनेकदा सोबत मॅच पाहताना बघितलं गेलं आहे. तसंच आयपीएलपूर्वीच्या Auction मध्ये जुही चावला, तिची मुलगी आणि आर्यन खान दरवर्षी दिसले आहेत. 

Web Title: Juhi Chawla says she cant watch IPL KKR match with Shahrukh Khan know the reason