जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:50 PM2021-04-27T17:50:48+5:302021-04-27T17:51:20+5:30

'मुंबई सागा' चित्रपट मार्च महिन्यात चित्रपटगृहात रिलीज झाला होता. त्यानंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे.

John Abraham and Imran Hashmi to meet on OTT after 'Mumbai Saga' theater | जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला

googlenewsNext

अमेझॉन प्राईम व्हिडिओने एक्शन ड्रामा 'मुंबई सागा'च्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली असून २७ एप्रिल पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर चित्रपट पहायला मिळणार आहे. संजय गुप्ता यांच्याद्वारे दिग्दर्शित, या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिका असून महेश मांजरेकर, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोहित रॉय, अमोल गुप्ते, समीर सोनी, गुलशन ग्रोवर आणि अंजना सुखानी यांच्यासारखे दिग्गज कलाकार सोबत असणार आहेत. ‘मुंबई सागा’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहीर यांनी टी-सीरीज़ आणि व्हाइट फेदर फिल्म्स बॅनरअंतर्गत केली आहे. 

हा एक्शन ड्रामा अमर्त्य राव (जॉन अब्राहम) आणि सीनियर इंस्पेक्टर विजय सावरकर (इमरान हाशमी) यांच्यामधील द्वंद्वाची एक काल्पनिक कहाणी आहे जी ९०च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर स्थापित आशा-आकांक्षा, मित्रता आणि विश्वासघात अशा विभिन्न पैलूंना स्पर्श करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई सागा तेव्हा असणाऱ्या बॉम्बे आणि आज बनलेल्या मुंबईची कहाणी आहे.  

‘मुंबई सागा’विषयी बोलताना अभिनेता जॉन अब्राहम म्हणाला की, “हा चित्रपट या मार्च महिन्यात थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांनी नावाजला आहे. चित्रपट पाहिलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेमुळे मी आनंदी आहे. ‘मुंबई सागा’चा आता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रीमियर होतो आहे आणि त्यामुळे जगभरात आमची मेहनत वाखाणली जाईल, ही भावना अद्भुत आहे.

तो पुढे म्हणाला की, ‘जिंदा’ आणि ‘शूटआउट ऍट वडाला’मध्ये एकत्र काम केल्यानंतर संजयसोबत ‘मुंबई सागा’ माझा तीसरा प्रोजेक्ट आहे. मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते कारण मला असे वाटते की माझ्यातील उत्तम बाहेर काढण्यामध्ये ते नेहमीच यशस्वी ठरतात आणि याहून ही महत्त्वाचे म्हणजे त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर माहिती असल्यामुळे त्यांनी केलेले चित्रपट दर्शकांनी पसंत केले आहेत. ‘मुंबई सागा’ एक एंटरटेनर आहे जी दर्शकांना पसंत पडेल. मी एक गैंगस्टर,  अमर्त्य रावची व्यक्तिरेखा सकारात असून मी आधी साकारलेल्या भूमिकांहून ही खूप वेगळी आहे पहिल्यांदाच मी इमरानसोबत काम करत असून त्याचा मला खूप आनंद आहे. आम्ही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप चंगले क्षण एकत्र घालवले आहेत. 
 

Web Title: John Abraham and Imran Hashmi to meet on OTT after 'Mumbai Saga' theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.