बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत रेखा खूप सुंदर दिसते आहे आणि या फोटोचे वैशिष्ट्यं म्हणजे या फोटोत रेखा यांच्यामध्ये अभिनेत्री जया बच्चन दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोत रेखा व जया बच्चन एकत्र दिसत आहेत. ते दोघीही खूप छान दिसत आहे. या दोघींनी साड्या नेसल्या आहेत. तर रेखा यांनी काजळ व टिकली लावली आहे तर जया बच्चन यांनी कानात मोठे झुमके व बिंदी लावली आहे. या फोटोत त्या साध्या व सुंदर दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोला खूप पसंती मिळते आहे. 
चाहत्यांचं म्हणणं आहे की, या फोटोत जया बच्चन व रेखा खूप सुंदर दिसत आहेत. तर काही चाहत्यांनी कमेंट केली की त्यावेळी रेखा यांना घाबरण्यासाठी कोणतेही कारण नव्हते. हा फोटो कोणत्या तरी इव्हेंटचा वाटतो आहे. हा व्हिडिओ कधी व कुठं घेतलेला आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.


रेखा यांच्याबद्दल बोललं जातं की त्यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं. सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम असल्याचं कबूल केलं होतं आणि इतर कोणी त्यांच्याबद्दल काय विचार करतात, याचा त्यांना अजिबात फरक पडत नाही. रेखा यांनी म्हटलं होतं की, मी स्वतःसाठी अमिताभवर प्रेम करते, कोणाला दाखवण्यासाठी नाही.


असंही बोललं जातं की रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये बराच काळ कोल्ड वॉर चालू होते. दोघांमधील नाते तेव्हा खराब झालं जेव्हा रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाव चर्चेत येऊ लागलं.

अद्याप या मुद्द्यावर जया बच्चन यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. मात्र अवॉर्ड फंक्शनमध्ये दोन्ही अभिनेत्री एकमेकांपासून दूर असतात.


Web Title: Jaya Bachchan and Rekha's photo getting viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.