Javed Akhtar defamation case; Kangana absent for interrogation at Juhu police station | जावेद अख्तर मानहानी प्रकरण; जुहू पोलीस ठाण्यातील चौकशीसाठी कंगना गैरहजर

जावेद अख्तर मानहानी प्रकरण; जुहू पोलीस ठाण्यातील चौकशीसाठी कंगना गैरहजर


मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा आरोप केल्यानंतर जुहू पोलिसांनी अभिनेत्री कंगना रनाैतला चौकशीसाठी शुक्रवारी हजर राहण्याचे समन्स पाठविले होते. मात्र ती पोलीस ठाण्यात हजर झाली नसून, यामागचे कारण तिच्या वकिलांनी पोलिसांना कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या समन्सनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक होते. अख्तर यांनी केलेल्या आरोपाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाने जुहू पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी कंगनाला बोलावण्यात आले होते.  पाेलिसांनी बजावलेल्या समन्सनुसार तिने चाैकशीसाठी हजर राहणे गरजेचे हाेते. मात्र, ती ती गैरहजर राहिली. 

कंगनाने माध्यमांसमाेर जावेद अख्तर यांच्याबाबत अपमानास्पद आणि मानहानी करणारे वक्तव्य केले, असा अख्तर यांनी तिच्यावर आरोप आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जुहू पोलिसांना १ फेब्रुवारी, २०२१ रोजी याबाबतचा अहवाल अंधेरी कोर्टासमोर सादर करायचा आहे.

देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी परवानगी घेतली का? -
अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली का, असा सवाल न्यायदंडाधिकारी यांनी तक्रारदार अली खाशिफ खान देशमुख यांना शुक्रवारी केला.

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी मी अर्ज करणार आहे, असे खान यांनी सांगितले. या अर्जावरील सुनावणी १० मार्च रोजी हाेईल. सोशल मीडियाद्वारे कंगना व तिची बहीण देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत व्यवसायाने वकील असलेले अली खाशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायालयात दाेघींविरुद्ध खासगी तक्रार केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Javed Akhtar defamation case; Kangana absent for interrogation at Juhu police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.